AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मॉगमुळे पुरुषांमध्ये येत आहे नपुंसकता, दिल्लीसारख्या शहरांमध्ये उध्वस्त होत आहे वैवाहिक जीवन

दिल्लीसारख्या शहरांमध्ये स्मॉग हे नपुंसकतेचे कारण बनत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष अभ्यासात समोर आला आहे.

स्मॉगमुळे पुरुषांमध्ये येत आहे नपुंसकता, दिल्लीसारख्या शहरांमध्ये उध्वस्त होत आहे  वैवाहिक जीवन
प्रदूषण आणि लैंगिक समस्या Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 10, 2022 | 3:53 PM
Share

नवी दिल्ली,  संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषण शिगेला पोहोचले असून राजधानीच्या आजूबाजूचे भागही त्याच्या विळख्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विषारी वायू, धूर, खडे, कारखान्यांमधून आणि वाहनांमधून निघणारा धूर यामुळे संपूर्ण शहरात स्मॉग वाढले आहे. धुके आणि धूळ यांचे मिश्रण असलेले स्मॉग हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे आणि ते अनेक रोगांना देखील आमंत्रण देते.  हवेत विरघळणारे हे प्रदूषणाचे विष अनेकांचे लैंगिक जीवनही(impotence due to smog) उध्वस्त करीत आहेत.

काय आहे संशोधन?

वाहनांमधून उत्सर्जित होणारा विषारी धूर इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन हा एक आजार आहे ज्यामध्ये पुरुषांचे वीर्य कमी होते तसेच लिंगमधली ताठरता कमी होते. ज्याचा थेट परिणाम लैंगिक जीवनावर होतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास स्मॉग पुरुषांना नपुंसक बनवू शकते.

टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्सवर धुके कसा परिणाम करतात

तज्ज्ञांना त्यांच्या संशोधनात वायू प्रदूषणामुळे टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सची वाढलेली पातळी यांच्यातील संबंध आढळून आला. हे दोन्ही संप्रेरक स्त्री-पुरुषांच्या लैंगिक क्षमता आणि प्रजनन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.

प्रदूषणाचा केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम लोकांच्या लैंगिक संबंधांवरही होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रदूषणामुळे लैंगिक संबंधांवर परिणाम होतो आणि त्यामुळे वंध्यत्वही येऊ शकते, असेही नुकतेच करण्यात आलेल्या या नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

याशिवाय केवळ वायू प्रदूषणच नाही तर ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक पर्यावरणीय घटकांमुळे व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

2019 मधील एका अभ्यासात, विषारी कारच्या धुराच्या संपर्कात आल्याने इरेक्टाइल डिसफंक्शनची अनेक प्रकरणे नोंदवली गेली. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की प्रदूषित विषारी कण शरीरात आत घेतल्यास रक्तवाहिन्यांना जळजळ होऊ शकते आणि ऑक्सिजन प्रजनन अवयवांपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक उत्तेजनाच्या क्षमतेवर परिणाम होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाच दावा करीत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.