AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stroke Risk: ‘या’ रक्तगटातील लोकांना असतो ‘पक्षघाता’ चा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध !

अमेरिकन संशोधकांच्या संशोधनानुसार, A रक्तगट असलेल्या लोकांना वयाच्या 60 वर्षापूर्वी स्ट्रोकचा धोका 16 टक्के वाढतो. B आणि O रक्तगट असलेल्यांना किंवा कोणत्या रक्तगटांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. जाणून घ्या, काय आहेत याची कारणे आणि कोणता रक्तगट असलेल्यांनी सावध राहावे.

Stroke Risk: ‘या’ रक्तगटातील लोकांना असतो ‘पक्षघाता’ चा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध !
पक्षाघात Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 08, 2022 | 4:25 PM
Share

स्ट्रोक ही एक गंभीर स्टेज आहे. जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा (Blood supply to the brain) थांबतो तेव्हा स्ट्रोकची स्थिती उद्भवते. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्याला आपण मेंदूचा झटका किंवा ब्रेनस्ट्रोक असे देखील म्हणतो. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव सुरू (Bleeding started) झाला की, स्ट्रोकची स्थिती येते. अशा स्थितीत व्यक्तीचा मृत्यूही होतो. जगासोबत भारतातही स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. ज्यामध्ये असे निदर्शनास आले की, कोणत्या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका (Risk of stroke) कोणाला जास्त असतो. कोणत्या रक्तगटांच्या लोकांना हा धोका अगदीच कमी आहे. संशोधनात तुमच्या रक्तगटाचाही उल्लेख असेल, परिणामी तुम्ही वेळीच सावध राहून तुमची जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.

या लोकांना पक्षाघाताचा धोका जास्त असतो

डेलीमेलच्या वृत्तानुसार, संशोधकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या रक्तगटावरून पक्षाघाताचा धोका निश्चित केला जाऊ शकतो. अमेरिकन संशोधकांनी स्ट्रोक आणि इस्केमिक स्ट्रोक (स्ट्रोकचा सर्वात सामान्य प्रकार) च्या अनुवांशिकतेमध्ये वर्गीकरण केले. इस्केमिक स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्ताची गुठळी मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा रोखते. हा स्ट्रोकचा सर्वसामान्य प्रकार आहे, प्रत्येक 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये अशी स्थिती उद्भवते. रक्ताच्या गुठळ्या सामान्यतः अशा ठिकाणी तयार होतात जिथे रक्तवाहिन्या कालांतराने अरुंद होतात.

शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, रक्तगट A असलेल्या लोकांना 60 वर्षापूर्वी स्ट्रोकचा धोका इतर सर्व रक्तगटाच्या लोकांपेक्षा 16 टक्के जास्त असतो. रक्तगटासोबतच लिंग, वजन आणि इतर घटकही कारणीभूत असतात. शिवाय, B रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका थोडा जास्त होता परंतु O रक्तगट असलेल्यांना सर्वात कमी धोका होता. संशोधकांनी सांगितले की, काही रक्तगटांसाठी हा धोका किरकोळ होता आणि लोकांनी याबद्दल काळजी करू नये.

O रक्तगटाच्या लोकांना आराम

न्यूरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, मेरीलँड विद्यापीठाच्या टीमने 7,000 स्ट्रोकचे रुग्ण आणि वेगवेगळ्या संशोधनात सहभागी असलेल्या 6 लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांना असे आढळले की, O रक्तगट असलेल्या लोकांना 60 वर्षापूर्वी पक्षाघात होण्याची शक्यता 12 टक्के कमी होती, तर B आणि AB रक्तगटावर कोणताही परिणाम होत नाही.

संशोधनात असेही म्हटले आहे की A रक्तगट असलेल्या लोकांमध्ये, प्रत्येक 16 पैकी एका प्रकरणामध्ये, स्ट्रोकचे कारण केवळ त्यांच्या रक्ताला कारणीभूत ठरू शकते. संशोधनाचे सह-अन्वेषक आणि न्यूरोलॉजीचे प्राध्यापक डॉ. स्टीव्हन किटनर यांच्या मते, ‘लोकांमध्ये लवकर स्ट्रोकची लक्षणे दिसून येत आहेत. पक्षाघातामुळे अशा लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे आणि जे वाचत आहेत त्यांना अपंगत्व येत आहे. रक्तगट A ला जास्त धोका का असतो हे आम्हाला अजूनही माहीत नाही.

या रक्तगटाच्या लोकांना असा धोका जास्त असतो

संशोधनात असे नमुद करण्यात आले आहे की, ज्या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

  1. ओ पॉजिटिव्ह (O positive) : 38% अधिक
  2. ओ निगेटिव्ह (O negative) : 7% अधिक
  3. ए पॉजिटिव्ह (A positive): 34% अधिक
  4. ए निगेटिव्ह ( A negative): 6% अधिक
  5. बी पॉजिटिव्ह (B positive): 9%अधिक
  6. बी निगेटिव्ह (B negative): 2% अधिक
  7. एबी पॉजिटिव्ह (AB positive): 3% अधिक
  8. एबी निगेटिव्ह (AB negative): 1% अधिक

अनुवांशिकतेची जोखीम समजून घेण्यात मदत करा

चॅरिटी स्ट्रोक असोसिएशनचे मध्ये रिसर्च कम्युनिकेशन आणि इंगेजमेंट प्रमुख डॉ. क्लेअर जोनास(Dr Clare Jonas) यांच्या मते, नवीन अभ्यास स्ट्रोकच्या आनुवंशिकतेचा धोका समजून घेण्यासाठी एक चांगले पाऊल आहे. रक्तगट A असलेल्या लोकांना लवकर स्ट्रोकचा धोका का असू शकतो हे अद्याप माहीत नाही. याचा अर्थ असा आहे की, स्ट्रोकच्या प्रतिबंधासाठी आपण अद्याप लवकर उपचार देखील विकसित करू शकलो नाही. तथापि, हे संशोधन स्ट्रोकच्या इतर जोखमींबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचे परीक्षण करण्यात मदत करू शकते. प्रत्येकाने पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत, वेळोवेळी रक्तदाब तपासावा आणि जीवनशैली सुदृढ ठेवावी.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच