AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Better diet: जगभरात ‘प्लांट बेस्ट डाएट’ चा वाढतोय कल; मधुमेह-कर्करोगात आहे अतिशय लाभदायक!

आहार निरोगी आणि पौष्टिक ठेवल्यास शरीराचे आरोग्य सुनिश्चित करता येते. संशोधनात असे आढळून आले आहे. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जाणून घ्या, कोणता डाएट प्लॅन सर्वाधिक वापरला जात आहे.

Better diet: जगभरात ‘प्लांट बेस्ट डाएट’ चा वाढतोय कल; मधुमेह-कर्करोगात आहे अतिशय लाभदायक!
Anti Aging DietImage Credit source: Google
| Updated on: Sep 05, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई :  वेगाने वाढणाऱ्या अनेक गंभीर आजारांसाठी आहारातील व्यत्यय (Dietary disturbances) देखील एक प्रमुख घटक म्हणून पाहिले जात आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, शरीर निरोगी आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी त्या पदार्थांच्या सेवनावर विशेष भर द्यायला हवा. ज्या आहारामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्व सहज मिळू शकतील. पाश्चात्त्य देशांमध्ये, हेच लक्षात घेऊन आहारात मोठा बदल करण्यात आला आहे, बहुतेक देशांमध्ये ‘प्लांटबेस्ड डाएट’ (Plant Based Diet) अर्थात वनस्पती-आधारित अन्नपदार्थांचा वापर वर्षानुवर्षे वाढत आहे. सध्या जगभरात, प्लांटबेस्ड डाएट’ ला अधीक महत्व दिले जात आहे. यात वनस्पती-आधारित गोष्टींचा समावेश करून आपण आरोग्यासाठी फायदे (Health benefits) कसे मिळविता येतात. जाणून घेऊया, काय आहे हा डाएट प्लॅन आणि याचे फायदे.

एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, आपण सर्वांनी असा आहार घेण्याची सवय लावल्यास, अनेक प्रकारच्या गंभीर आणि जुनाट आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल. वनस्पती-आधारित पदार्थ शरीराला कसे फायदेशीर ठरू शकतात ते जाणून घेऊया.

काय आहे प्लांट बेस्ड डाएट

आहारतज्ज्ञ डॉ. गरिमा चौधरी म्हणतात, “वनस्पती-आधारित आहार म्हणजे प्लांट बेस्ड डाएट होय. या वनस्पती-आधारित अन्नपदार्थांच्या सेवनावर गेल्या अनेक वर्षांपासून भर दिला जात आहे. दरम्यान, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, वनस्पती-आधारित आहाराचा काय अर्थ आहे

मटण-मासे निर्बंधित नाही

वनस्पती आधारित पदार्थ म्हणजे तुमच्या आहारातील बहुतेक गोष्टी वनस्पतींवर आधारित असाव्यात जसे की, पाले-भाज्या, संपूर्ण धान्य आणि फळे, सॅलड इ. आपल्या प्लेटचा दोन तृतीयांश भाग या वनस्पती-आधारित पदार्थांनी भरलेला ठेवा. उरलेल्या एक तृतीयांश मध्ये, आपण इच्छित असल्यास, अंडी, मासे किंवा इतर गोष्टी जोडू शकता.

वनस्पती(प्लांट बेस्ड) आहारात भरपूर फायबर

वनस्पती-आधारित आहारामध्ये भरपूर फायबर असते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. पचनक्रिया व्यवस्थित राहते. वनस्पती-आधारित आहार घेतल्याने तुमची आतडे देखील निरोगी राहतात. तुम्ही अन्नातून पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेवू शकता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त मानले जाते.

अनेक रोगांवर फायदेशीर

वनस्पती-आधारित आहारामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते. याशिवाय, ते प्रथिने सारख्या इतर अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांनी देखील समृद्ध असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत, अशा आहारामुळे रोगांचा धोका कमी होण्यास मदत होते. अभ्यासामध्ये असे आढळले आहे की वनस्पती-आधारित आहार हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि काही मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.