AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : तुमच्या चेहऱ्यावरही आहे का ‘अशी’ चामखीळ? दुर्लक्ष करू नका; ठरू शकते ‘ या ‘ गंभीर आजाराची सुरुवात

शरीरावर दिसणाऱ्या चामखीळीकडे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात, त्याकडे जास्त लक्षही जात नाही. मात्र हे साधारण दिसणारे, छोटेसे चामखीळ बऱ्याच वेळा धोकादायक ठरू शकतात. या चामखीळीमुळे तुम्हाला कॅन्सर (Cancer) सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते.

Health : तुमच्या चेहऱ्यावरही आहे का 'अशी' चामखीळ? दुर्लक्ष करू नका; ठरू शकते ' या ' गंभीर आजाराची सुरुवात
Image Credit source: Aajtak
| Updated on: Jul 09, 2022 | 11:47 AM
Share

जन्मखूण (Birth marks), ब्युटी स्पॉट्स (Beauty spots) किंवा चामखीळ म्हणा, शरीरावर हे छोटे-मोठे डाग आयुष्यभर तसेच राहतात. अनेक वेळा या खुणांमुळेच एखादा माणूस ओळखला जातो. शरीरावरील काही भागात हे असणे, फारसे धोकादायक नसते, मात्र कधीकधी हीच चामखीळ कॅन्सरचे (Cause of Cancer) कारणही बनू शकते. त्यामुळे शरीरावर तयार होणाऱ्या चामखीळीचा रंग आणि आकार याकडे लक्ष दिले पाहिजे. या कॅन्सरयुक्त चामखीळीला मेलोनामा किंवा एका प्रकारचा स्किन कॅन्सर म्हणून ओळखले जाते, जे त्वचेच्या पिगमेंट प्रोड्युसिंग सेल्समध्ये विकसित होतो. त्याला मेलानोसाइट्स असे म्हटले जाते. खरतर, सर्व प्रकारच्या स्किन कॅन्सरमध्ये मेलेनोमा कॅन्सरचे प्रमाण फक्त 1 टक्के आहे. मात्र अतिशय धोकादायक कॅन्सर आहे. वेळेवर निदान झाल्यास त्याचा योग्य इलाज होऊ शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेबाबत सतर्क राहून वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.युव्ही रेडिएशनच्या अधिक संपर्कात आल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. कडक उन्हात न जाणे, संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालणे, घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावणे असे अनेक उपाय त्यावर आहेत.

मेलोनामाचे संकेत आणि लक्षणे

कॅन्सरयुक्त चामखीळ कोणती, हे सुरुवातीच्या काळात समजणे अवघड असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या त्वचेची तपासणी करत राहणे, गरजेचे आहे. त्वचेवर नवा डाग किंवा चामखीळीसारखे काही आढळल्यास, त्वरित डॉक्टरांकडे जावे. मेलोनामा रिसर्च फाऊंडेशनने लक्षणांची एक यादी तयार केली आहे. तुम्हाला त्यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेत कोणताही बदल, एखादी नवी चामखीळ अथवा आधीच्या चामखीळीचा रंग वा आकार बदलणे. शरीरावरील एखादी चामखीळ दुखणे, त्याला खाज सुटणे, रक्त येणे. ती चमकणे. त्वचेवर कोरडे, फ्लॅट लाल स्पॉट्स दिसणे. पाय अथवा नखांवर व गडद रंगाची लाइन दिसणे, यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे.

 कॅन्सरयुक्त चामखीळ कशी ओळखाल?

चामखीळीची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा वेगळी असणे.

त्याची बॉर्डर सुरकुतलेली असणे.

चामखीळीचा रंग करडा, काळा किंवा निळा दिसणे.

त्याचा आकार 6 मिलीमीटर पेक्षा जास्त असणे.

चामखीळीचा आकार वेळोवेळी बदलत राहणे.

मेलेनोमाची कारणे

मिलानोसाइट्स या मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींमध्ये बिघाड झाल्यास मेलेनोमा होऊ शकतो. जुन्या पेशी मेल्यावर नव्या पेशी तयार होता, मात्र त्यांच्या डीएनएमध्ये बिघाड झाल्यास नव्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होतात. यूव्ही किरणे आणि रेडिएशनच्या अधिक संपर्कात आल्यास मेलेनोमा होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच काळ्या रंगाच्या तुलनेत गोऱ्या लोकांमध्ये मेलेनोमाचा धोका अधिक असतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पूर्वी मेलेनोमा असल्यास इतर सदस्यांना कॅन्सरचा धोका असतो. वाढत्या वयानुसारही मेलेनोमाचा धोका वाढतो.

कसा कराल मेलेनोमापासून बचाव ?

युव्ही किरणांच्या संपर्कात येणे टाळावे. बाजारात मिळणारे खास चष्मे, लोशन वापरा. बाहेर जाताना संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरा. त्वचेची वेळोवेळी तपासणी करत रहा. त्वचेवरील चामखीळीत काही बदल दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे. कुटुंबात आधी कोणालाही मेलेनोमा झाला असेल, तर कुटुंबातील सर्वांनी वेळोवेळी तपासणी करत रहावी.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.