AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Rajput Beauty Secret: जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीसारखी ‘ग्लोइंग स्किन’ हवी असेल तर वापरून पहा, मीरा राजपूतची ‘ही’ ब्युटी हॅक!

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फ्रेश आणि एनर्जेटिक फोटो शेअर करत असते. तिच्या ग्लोइंग स्किन बद्दल विचाराल तर, घरगुती उपचार हे मीरा राजपूतच्या निरोगी त्वचेचे रहस्य आहे. जाणून घ्या, मीरा राजपूतचे स्किन सिक्रेट.

Mira Rajput Beauty Secret: जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीसारखी ‘ग्लोइंग स्किन’ हवी असेल तर वापरून पहा, मीरा राजपूतची ‘ही’ ब्युटी हॅक!
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 09, 2022 | 1:30 AM
Share

मुंबईः शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतची फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. मीरा राजपूत खूप सुंदर आहे आणि तिची त्वचा देखील खूप ग्लोइंग आहे. इन्स्टाग्रामवरही ती बर्‍याचदा त्वचेच्या काळजीशी संबंधित (Related to skin care) व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय तिच्या सर्व फोटोवरून तिच्या चमकदार त्वचेचा अंदाज लावता येतो. फोटोंमध्ये मीरा एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक (Fresh and energetic) दिसते आहे. मीरा आपल्या त्वचेचे पोषण करण्यासाठी अनेकदा नैसर्गिक घटकांचा (Of natural ingredients) वापर करते. मीराच्या स्किन केअर रूटीनबद्दल बोलताना मीरा राजपूत नैसर्गिक गोष्टींचा भरपूर वापर करते. हळद, मध, गुलाबपाणी या नैसर्गिक सौंदर्य घटकांच्या मदतीने मीरा तिच्या त्वचेचे पोषण करते आणि त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. जाणून घ्या, मीरा राजपूतच्या काही ब्युटी हॅक..

 मध आणि हळद पेस्ट

सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर वर्षानुवर्षे होत आहे. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. मीरा हळद आणि मधाची पेस्ट त्वचेवर लावते. हे त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. मध आणि हळद मिक्स करून ही पेस्ट त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करावा. हा मसाज मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला चमक आणण्याचे काम करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे कोटिंग बहुतेक त्वचेच्या प्रकारांना शोभते.

कच्च्या दुधाने त्वचा स्वच्छ होते

मीराही अनेकदा त्वचेवर कच्चे दूध वापरते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चे दूध खूप चांगले काम करते. सन डॅमेज आणि टॅनिंग सारख्या समस्या दूर करते. मीरा तिच्या त्वचेबरोबरच तिच्या लहान मुलांच्या त्वचेवरही कच्चे दूध वापरते. कधीकधी मीरा दही, बेसन आणि मध यांचा फेस पॅक वापरते.

देशी तुपाचा वापर

मीरा त्वचेच्या काळजीसाठी देशी तूप देखील वापरते. तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यासाठी तूप उपयुक्त मानले जाते. हे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.

भरपूर पाणी प्या

मीरा सांगते की, जर तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर त्वचा हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. मीरा त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. याशिवाय रसदार फळे आणि अधिक पाणी असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करते.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं