AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Cancer : ‘या’ लोकांना असतो स्किन कॅन्सरचा जास्त धोका, ही लक्षणे दिसली तर लगेच करावेत उपचार

Skin Cancer Symptoms and Treatment : जेव्हा त्वचेमध्ये पेशी वेगाने वाढू लागतात तेव्हा ते कर्करोग होते. इतर कर्करोगाच्या तुलनेत भारतात स्किन कॅन्सरचे प्रमाण कमी आहे.

Skin Cancer : 'या' लोकांना असतो स्किन कॅन्सरचा जास्त धोका, ही लक्षणे दिसली तर लगेच करावेत उपचार
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 05, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : आपली त्वचा अतिशय संवेदनशील (sensitive) असते, त्यामुळे तिची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जगभरात स्किन कॅन्सर (skin cancer) म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. भारतातही या कॅन्सरची प्रकरणे नोंदवली जातात. त्याची लक्षणे सुरुवातीला त्वचेवर दिसू लागतात, परंतु लोक त्याकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर हा आजार खूप वाढतो. मात्र हा आजार वेळीच ओळखला गेला तर त्यावर सहज उपचार (treatment for skin cancer) होऊ शकतात. केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि मोहस सर्जरी या प्रक्रिया त्वचेच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. परंतु ही चिंतेची बाब आहे की या आजाराची बहुतांश प्रकरणे ॲडव्हान्स स्टेजमध्ये नोंदवली जातात, त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे हे एक आव्हान बनते.

अशा स्थितीत त्वचेच्या कर्करोगाविषयी पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. त्वचेचा कर्करोग का होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया

असा होतो स्किन कॅन्सर / त्वचेचा कर्करोग

ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा त्वचेतील पेशी वेगाने वाढू लागतात तेव्हा त्वचेचा कर्करोग अथवा कॅन्सर होतो. जे भाग सूर्याच्या थेट संपर्कात येतात तेथे त्वचेचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते, परंतु भारतात त्वचेच्या कॅन्सरची प्रकरणे कमी नोंदवली जातात. कारण इथल्या लोकांमध्ये मेलेनिनचे प्रमाण पुरेसे असते. या रंगद्रव्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. या कारणामुळेच ज्या लोकांची त्वचा गोरी असते, त्यांना त्वचेचा कॅन्सर होण्याचेप्रमाण अधिक असते. यामुळे युरोप आणि अमेरिकेत त्वचेचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो, तर भारतात फारच कमी प्रकरणे आढळतात.

अनुवांशिक कारणांमुळेही होऊ शकतो त्वचेचा कॅन्सर

डॉक्टरांच्या मते त्वचेचा कर्करोग आनुवंशिक कारणांमुळेही होऊ शकतो. याचा अर्थ, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला तो झाला असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या कुटुंबात त्वचेच्या कर्करोगाचा इतिहास आहे, त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी. यामुळे कर्करोग टाळण्यास मदत होईल.

ही आहेत स्किन कॅन्सरची लक्षणे

– त्वचेला सतत खाज सुटणे

– त्वचेवर लाल ठिपके दिसणे

– तीळ किंवा मस्सा यांची अचानक निर्मिती होणे आणि आकार वाढणे

– त्वचेवर अनेक पांढरे ठिपके दिसणे

– त्वचा सोलवटली जाणे

– त्वचेवरील तिळामधून अचानक रक्त येणे

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.