बाजारातील चमकदार रताळ्यांना फसू नका! घरी बसल्या 2 मिनिटांत ओळखा खरे आणि..
हिवाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात ताज्या भाज्या आणि फळे येतात. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात रताळे देखील बघायला मिळतात. मात्र, रताळे खाताना थोडा विचार नक्कीच करा.

बाजारात नकली आणि रंग लावलेले रताळे विकले जात आहेत, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रताळ्यांची शुद्धता तपासू शकता. हिवाळा आला की बाजारात रताळी पाहायला मिळतात. थंडीच्या दिवसांत रताळे खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. कोणी उकडून मीठासोबत खातं, तर कोणी त्याची चवदार चाट तयार करतं. काही जण भाजलेले रताळे आवडीने खातात, तर काही घराघरात भाजी किंवा पुरीसोबतही रताळ्याचा वापर केला जातो. रताळे चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त मानला जातात. फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर आवश्यक पोषक घटकांमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
रताळे आवडीने खाणाऱ्यांसाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. सध्या बाजारात काही ठिकाणी खोट्या पद्धतीने तयार केलेले, रंग लावलेले रताळी विकले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हे रताळे अधिक चमकदार दिसावेत यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला जातो, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. असे रताळे सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
रासायनिक पद्धतीने प्रक्रिया करून तयार केलेले रताळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा रताळांमध्ये वापरले जाणारे रंग आणि केमिकल्स पचनसंस्थेवर वाईट परिणाम करू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी आणि इतर पचनाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा रताळ्याचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि आरोग्याचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
रताळे आरोग्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे?
रताळे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रताळ्यात असलेले नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात व थकवा दूर करण्यास मदत करतात. तसेच जीवनसत्त्व A, C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर विविध आजारांपासून सुरक्षित राहते. रताळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. बीटा-कॅरोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, तर त्वचेला पोषण मिळून ती निरोगी व तेजस्वी राहण्यास मदत होते. एकूणच, नियमित आणि योग्य प्रमाणात रताळे सेवन केल्यास शरीराला पोषण मिळते आणि आरोग्य टिकून राहते.
