भूक न लागणे, डिप्रेशन, ही आहेत ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे, त्रास वाढण्याआधीच व्हा सावध
शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता निर्माण झाल्यास लाल रक्तपेशी कमी तयार होता, त्यामुळे प्रत्येक अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजनपुरवठा होत नाही. ही समस्या वाढल्यास केवळ शारीरिकच नव्हे तर स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या मानसिक समस्याही उद्भवतात.

नवी दिल्ली – आपल्या शरीराचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी आवश्यक अशा व्हिटॅमिन्स व मिनरल्सची (vitamins and minerals) कमतरता निर्माण न होणे हे महत्वाचे असते. मात्र बऱ्याच वेळेस खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष न दिल्यामुळे आवश्यक त्या पोषक तत्वांची (nutrition) कमतरता निर्माण होते. असंच एक आवश्यक व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी12, (vitamin B12) त्याची थोडीशीही कमतरता आपल्यासाठी भारी पडू शकते. व्हिटॅमिन बी12 हे आपलं शरीर बनवत नाही, आहारातून आपण ते मिळवतो. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी आणि डीएनए बनवण्यासाठी हे व्हिटॅमिन मदत करतं आणि आपल्या मज्जासंस्थेलाही सपोर्ट करते.
जेव्हा शरीरात पुरेशा रक्तपेशी तयार होतात, तेव्हा प्रत्येक अवयवातून ऑक्सिजन चांगल्या प्रकारे शोषला जाऊ शकतो, ज्यामुळे आपले शरीर आणि अवयव निरोगी राहतात. व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक समस्या सुरू होऊ शकतात. मासे, अंडी, दूध, मांस, चिकन, वनस्पती दूध, काही धान्ये इत्यादींचा आहारात समावेश करून आपण याचा पुरवठा पूर्ण करू शकतो.
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे
– चालताना किंवा बसताना पायाला मुंग्या येतात, काही वेळा पाय सुन्न होणे.
– लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे त्वचा निघू लागते व ती पिवळी दिसू लागते.
– अशक्तपणा येतो, वारंवार चक्कर येते, थकवा आल्यासारखे वाटणे.
– नाडी वेगवान होते व घाबरल्यासारखे वाटते
– श्वास घेण्यास त्रास होतो, थोडंसं अतंर चालल्यावरही दम लागणे
– तोंडात फोड येणे
– स्मरणशक्ती कमी होते , माणूस छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे
– डिप्रेशन
– उलटी, अतिसार, चक्कर येणे
– वजन कमी होते व भूक लागत नाही.
व्हिटॅमिन बी12 कमतरता कमी करण्याचे उपाय
– आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यात व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात असते.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी12 सप्लीमेंट्सचे सेवन करावे.
