AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलन सीझन म्हणजे काय ? का होतो सर्दी-खोकल्याचा त्रास? बचावासाठी जाणून घ्या टिप्स

पोलन सीझन म्हणजे परागकणाच्या हंगामात जगभरातील लाखो लोकांना सर्दी आणि फ्लूचा त्रास होतो. याला खरंतर पोलन ॲलर्जी म्हणतात.

पोलन सीझन म्हणजे काय ? का होतो सर्दी-खोकल्याचा त्रास? बचावासाठी जाणून घ्या टिप्स
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 21, 2023 | 3:09 PM
Share

नवी दिल्ली : हिवाळ्यानंतर येणारा वसंत ऋतू कोणालाही भुरळ घालतो. पण आजकाल अतिशय बारीक कण हवेत उडताना दिसतात हे तुमच्या लक्षात आले आहे का? खरंतर ते परागकण असतात, जे फुलं उमलताना बाहेर पडतात आणि हवेत मिसळतात. बहुतेक लोकांना याचा काही त्रास होत नसला तरी काही लोकांना या हंगामात सर्दी आणि फ्लूचा (cold and flu) त्रास होतो. म्हणूनच या ऋतूला फ्लू सीझन किंवा पोलन सीझन (pollen season) असेही म्हणतात. जर तुम्हालाही पोलन ॲलर्जीचा त्रास होत असेल, तर त्यापासून वाचण्यासाठी उपाय (how to prevent pollen allergy) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पोलन सीझन म्हणजे काय ते जाणून घ्या

वसंत ऋतुच्या आगमनाने पोलन सीझन सुरू होतो. सर्वत्र झाडांवर आणि वनस्पतींवर नवीन पाने आणि फुले दिसू लागतात. या परागकणांमुळे काही लोकांना ॲलर्जी होते. फुलांमध्ये पावडरसारखे छोटे कण असतात, त्यांना पोलन किंवा परागकण म्हणतात. जेव्हा मधमाशी किंवा फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडते तेव्हा हे परागकण नावाचे हे छोटे कण त्यांच्या पायाला चिकटतात. हे परागकण इतके लहान असतात की ते हवेत पसरतात आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपले शरीर ते ओळखू शकत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरात ॲलर्जिक रिॲक्शन होते.

काय आहेत पोलन ॲलर्जीची लक्षणे ?

पोलन ॲलर्जीमुळे शिंका येणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, नाक बंद होणे, घसा खवखवणे, सायनस, खोकला ही लक्षणे दिसतात. ज्यांना आधीपासूनच दमा आहे अशा लोकांना यावेळी जास्त त्रास सहन करावा लागतो. जर स्थिती गंभीर असेल तर श्वासनलिका अरुंद होते आणि श्वास घेण्यास खूप त्रास होतो.

जाणून घ्या बचावाचे उपाय (how to prevent pollen allergy)

1) मास्क लावूनच बाहेर पडा

जर तुम्हाला दमा किंवा ॲलर्जी असेल तर बाहेर जाणे टाळा. बाहेर जावेच लागले तर सर्वप्रथम तुम्ही N-95 मास्क आणि गॉगल घालावा जेणेकरून हवेतील परागकण टाळता येतील.

2) दिवसा दरवाजे व खिडक्या बंद ठेवा

घरातील कोणत्याही व्यक्तीला ॲलर्जी असेल अथवा सर्दी-खोकला लवकर होत असेल तर दिवसा घराच्या खिडक्या व दारं बंद ठेवावे.

3) रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या

तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा जेणेकरून कोणताही विषाणू तुम्हाला आजारी पडू शकणार नाही. डाळी, स्प्राउट्स, सोयाबीन, अंडी, चिकन तसेच मोसंबी यांसारखी लिंबूवर्गीय फळे, यांसारखी प्रथिने आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

4) वेळेवर औषधे घ्या

या सीझनमध्ये दम्याच्या रुग्णांना अधिक समस्या असू शकतात, त्यामुळे या ऋतूत बाहेर पडू नका किंवा मॉर्निंग वॉकसाठी जाऊ नका कारण यामुळे समस्या आणखी वाढू शकते. तसेच योग्य वेळी औषधे घेत राहा जेणेकरून तुम्हाला फ्लू टाळता येईल.

5) रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करा

या ऋतूच्या सुरुवातीला काही घरगुती उपाय करून पहा. त्यासाठी तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. केस आणि त्वचेवर परागकण जमा होऊ शकतात आणि तुम्ही जिथे जाल तिथे ते तुमच्यासोबत येऊ शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ अंघोळ करण्याचा अथवा हात-पाय धुण्याचा प्रयत्न करा किंवा आंघोळ करा.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....