AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

आजकाल चुकीच्या आहारामुळे गुडघेदुखी, स्नायूंचा ताठरपणा आणि अंगदुखी या समस्या अगदी कमी वयातही उद्भवत आहेत. पण यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक घटकांचा वापर करून हा वेदनाशामक लेप बनवा. चला तर मग आजच्या लेखात हा लेप कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
knee pain
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 3:07 PM
Share

सांधेदुखी किंवा स्नायूंचा वेदना त्रासदायक झाल्या की उठताना आणि बसताना गुडघ्यात तीव्र वेदना जाणवते. आजकाल तरूण वयातच अनेकांना या समस्या निर्माण होत आहे. या वेदनादायक समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आहार सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होणे आणि हाडांची झीज होणे यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे वेदना आणि ताठरपणा येऊ शकतो. लोकं अनेकदा गुडघेदुखीची वेदना कमी करण्यासाठी रोज पेन किलर औषधांवर अवलंबून राहतात, परंतु हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी आरोग्याची काळजी बघता घरगूती नैसर्गिक घटकांचा वापर करणे उत्तम ठरेल. कारण या उपायांमुळे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

पेन किलर गोळ्या घेण्याऐवजी गुडघे आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही या घरगुती घटकांपासून बनवलेली पेस्ट लावू शकता. अशातच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह या नेहमी इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा आरोग्याच्या छोट्या टिप्स देत असतात. त्यांनी एका अशा नैसर्गिक लेपबद्दल सांगितले आहे, जी अगदी कमी घटकांपासून बनवता येते आणि गुडघेदुखी आणि स्नायुंच्या वेदनांपासून आराम देते. चला तर मग गुडघेदुखी आणि स्नायुंपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या लेपचा वापर करावा आणि कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

नैसर्गिक घटकांपासून लेप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एरंडेल तेल, चिमूटभर सुंठ पावडर, चिमूटभर हळद, मेथी पावडर लागेल.

हा लेप कसा बनवायचा?

हा लेप बनवण्यासाठी कोणतीही गरम प्रक्रिया नाही तसेच जास्त साहित्याची गरज नाही. फक्त थोडे एरंडेल तेल घ्या आणि त्यात सुंठ पावडर, हळद आणि मेथीची पावडर मिक्स करून लेप तयार करा. हा लेप बनवायला एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार होतो.

हा लेप कसा लावावा?

तुम्ही तयार केलेला लेप तुमच्या गुडघ्यांना किंवा जास्त दुखत असलेल्या सांध्याला लावू शकता. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तो रात्रभर तसाच ठेवू शकता किंवा काही तासांसाठी लावू शकता.

हा लेप कशा प्रकारे काम करते?

हा तयार लेप एरंडेल तेलावर आधारित आहे, जे खोलवर शिरून तुमच्या स्नायू आणि सांध्यांमधील ताठरपणा किंवा वेदना कमी करते. सुंठ पावडर रक्ताभिसरण सुधारून वेदना कमी करते, तर हळद सूज कमी करण्यास मदत करते. मेथी सांधे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

सांधेदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की अयोग्य आहार आणि प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम व व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक तत्वांची अपुरी उपलब्धता. आणखी एक कारण म्हणजे हालचालींचा अभाव. तासनतास एकाच स्थितीत बसल्याने, उभे राहिल्याने किंवा झोपल्याने स्नायू आखडतात आणि दुखतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात आणि आहारात बदल केले पाहिजेत. जर ही समस्या कायम राहिली किंवा वारंवार उद्भवली, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...