AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heater Side Effects: हिवाळ्यात हिटरचा वापर ठरू शकतो हानिकारक, या गोष्टी ठेवा लक्षात !

हिवाळ्यात घर उबदार ठेवण्यासाठी लोक बऱ्याचवेळेस हिटरचा वापर करतात. पण थंडीपासून बचाव करणारा हा हिटर खूप हानिकारक ठरू शकतो.

Heater Side Effects: हिवाळ्यात हिटरचा वापर ठरू शकतो हानिकारक, या गोष्टी ठेवा लक्षात !
| Updated on: Nov 29, 2022 | 2:30 PM
Share

नवी दिल्ली – थंडीचा ऋतू (winter) येताच उबदार (to feel warm) वाटावं म्हणून आणि थंडीत आजारी पडू नये म्हणून अनेक उपाय करतात. काही लोक गरम पाण्याने आंघोळ करू लागतात. तर काही लोकं आहारात बदल करत स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय अनेक लोक असेही असतात जे हिवाळा सुरू होताच घरात हिटरचा वापर करू लागतात. सध्या वाढत्या थंडीमुळे रूम हिटर्सचा (room heater) ट्रेंड चांगलाच वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेकदा हीटरचा वापर करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का, की थंडी टाळण्यासाठी वापरण्यात येणारा हा हीटर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो ? तुम्हीसुद्धा हिवाळ्यात रूम हीटरचा वापर करत असाल तर हे नक्की वाचा. हिटर वापरण्याच काही तोटे आहेत, ते जाणून घ्या.

श्वासासंबंधी आजार होऊ शकतात

थंडीच्या काळात घरात वापरल्या जाणाऱ्या हिटरचा आपल्या आसपासच्या वातावरणावर मोठा परिणाम होतो. खरंतर हिचर केवळ हवेतील आर्द्रता कमी करत नाही, तर तो वापरत असताना अनेक हानिकारक गॅसही सोडले जातात, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊन हानी पोहोचू शकते. अशावेळी हिटरच्या वापरामुळे श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय अस्थमाच्या रुग्णांसाठीही हिटरचा वापर घातक ठरतो.

डोळ्यांचे होते नुकसान

आपल्या शरीरामध्ये अनेक संवेदनशील अवयव असतात. त्यातील एक अवयव म्हणजे डोळे. ते आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग तर आहेतच, पण त्यांची विशेष काळजीही घेणे आवश्यक आहे. मात्र हिवाळ्यात हिटरचा सतत वापर केल्यास डोळ्यांचे नुकसानही होऊ शकते. खरंतर डोळे निरोगी रहावेत यासाठी ते ओले राहणं महत्वाचं आहे, मात्र हिटरमुळे हवेतील आर्द्रता अथवा ओलावा कमी होतो, ज्यामुळे डोळे देखील कोरडे होऊ लागतात. अशावेळी डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.

त्वचेसाठी धोकादायक हिटर

हिटरचा जास्त वेळ वापर केल्यामुळे आपल्या आसपासच्या वातावरणातील ओलावा संपतो. हवेतील कोरडेपणामुळे त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. कोरड्या वातावरणामुळे त्वचेचा ओलावाही नाहीसा होतो आणि आपली त्वचा कोरडी पडू लागते. एवढेच नव्हे तर कोरडेपणामुळे त्वचा फुटण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोकाही लक्षणीयरित्या वाढतो.

हिटरमुळे होऊ शकते दुर्घटना

हिटर खूप वेळ चालू ठेवल्यास त्याची बाहेरील बाजू गरम होते, ज्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. त्याशिवाय नॉन-मेटालिक हिटर जास्त गरम झाल्यास आजूबाजूच्या वस्तू, कापड किंवा प्लास्टिक वितळण्याचा किंवा जळण्याचा धोकाही असतो.

या लोकांनी टाळावा हिटरचा वापर

जर तुम्हाला दमा किंवा श्वसनासंदर्भातील कोणताही त्रास असेल तर तुम्ही हीटर वापरणे टाळावे. तुम्ही सामान्य हिटरऐवजी ऑइल हिटर वापरू शकता. यामुळे हवेत ओलावा राहतो. तसेच सायनस किंवा ब्राँकायटिसचा त्रास असेल तर त्या व्यक्तींनीही हिटरचा वापर टाळायला हवा. याशिवाय लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी हिटरपासून लांब रहावे.

हिटरचा वापर करताना या गोष्टी ठेवा लक्षात

– जर तुम्ही हिटर विकत घेत असाल तर ऑइल हिटर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. अशा हिटरमुळे हवा कोरडी पडत नाही.

– रात्रभर हिटर सुरू ठेवून झोपू नये. झोपण्याच्या एक तास आधी हिटर लावून खोली गरम अथवा उबदार करावी. मात्र झोपताना हिचर आठवणीने बंद करावा.

– जेव्हा आपण हिटर सुरु कराल, तेव्हा त्याच्या बाजूला एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवावे. त्यामुळे हवेत ओलावा राहील आणि कोरडेपणा टाळता येईल.

– हिटर वापरत असल्यास, त्वचेला चांगले मॉयश्चरायझर लावावे, त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. तसेच डोळ्यांचा काही त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

– दम्याचा त्रास असेल किंवा हृदयाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी हिटरचा शक्यतो कमी वापर करावा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप