AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : सकाळी उठल्यावर करा ‘या’ गोष्टी झपाट्याने कमी वजन होईल कमी, जाणून घ्या!

लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी फिट राहण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. डाएट, वर्कआउट असे वेगवेगळे उपाय ते करत असतात. मात्र  तुम्हाला माहितीये का की तुम्ही सकाळी उठून काही नियम फॉलो केले तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. 

Weight Loss : सकाळी उठल्यावर करा 'या' गोष्टी झपाट्याने कमी वजन होईल कमी, जाणून घ्या!
weight lossImage Credit source: Social Media
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 25, 2023 | 11:49 PM
Share

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही. दररोजचा कामाचा ताण, बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या शरीराची नीट काळजी घेत नाही. मग फास्टफूड खाण्यावर भर, एकाच जागी बसून काम करणं या गोष्टींमुळेच आपल्या शरीराची जास्त हालचाल होत नाही, त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. मग बहुतेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी फिट राहण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. डाएट, वर्कआउट असे वेगवेगळे उपाय ते करत असतात. मात्र  तुम्हाला माहितीये का की तुम्ही सकाळी उठून काही नियम फॉलो केले तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी एक ग्लास पाणी पिलं पाहिजे. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते जे आपले मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते. तसंच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी पाण्यात लिंबाचा तुकडा किंवा सफरचंद सायडर व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि ते प्या.

दररोज नियमीत व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपले शरीर फिट राहते.

तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा. तुम्ही नाष्टा केल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तसंच यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुम्ही बाहेरील खाणंही बंद करू शकता. तसंच सकाळच्या नाष्ट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट या गोष्टींचा समावेश करा आणि पौष्टिक आहार घ्या.

फिट राहण्यासाठी दररोज सकाळी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्या. कारण यामधील काही घटक मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी मदत करतात. तसंच ग्रीन टीमध्ये काही एंटीऑक्सीडंट असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती