.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : वजन कमी करताय? मग सकाळी सकाळी होणाऱ्या ‘या’ चुका टाळाच!

तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडी सबुर ठेवा. वजन कमी करताना सकाळी सकाळी तुम्ही काही चुका तर करत नाहीत ना? सकाळी सकाळी होणाऱ्या काही चुका तुमच्या आरोग्यावर बेतू शकतात.

Weight loss : वजन कमी करताय? मग सकाळी सकाळी होणाऱ्या 'या' चुका टाळाच!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jul 09, 2022 | 8:13 PM
Share

मुंबई :  प्रत्येकाला आपण सडपातळ, यंग आणि हँडसम दिसावं असं वाटतं. आजच्या पिढीमध्ये तर सडपातळ दिसण्याचं जणू फॅडच आलं आहे. त्यामुळे वजन कमी (Weight loss) करण्यासाठी प्रत्येकजण नाना क्लृप्त्या करत असतो. कोणी जीममध्ये घाम गाळतो, कोणी डायट (Diet) करतो तर कोणी सायकलिंग करतात. काही लोक तर दिवसातून एकच वेळ जेवतात. अनेक पथ्य पाळतात. तर काही लोक तर थेट डॉक्टरकडे जाऊन औषधे (medicine) घेऊन बारीक होण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कधी कधी मनाचे प्रयोग अंगलट येऊ शकतात. काही गोष्टी योग्य सल्ल्यानेच करायला हव्यात. त्यामुळे डोक्याला ताप राहत नाही. तुम्ही जर सडपातळ होण्याचा किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आणंखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी सकाळच्यावेळी काही गोष्टी करणं आणि न करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही त्या गोष्टी करत नाहीत ना? काय करावे आणि काय करू नये यासाठी खालील गोष्टी जरूर वाचा.

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. यातील काही ट्रिक्सचा फायदा होतो. तर काहींमुळे नुकसान होतं. त्यामुळे काही गोष्टींचं बंधन पाळणं आवश्यक आहे. तुम्हीही काही चुका तर करत नाही ना? करत असाल तर आजपासून त्या टाळाच. नाही तर मोठं नुकसान होईल.

अधिक गरम पाणी पिणे

अधिक कडक किंवा गरम पाणी प्यायलास चरबी जळते असा लोकांमध्ये गैरसमज पसरला आहे. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, अधिक गरम पाणी प्यायल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाणी प्यायला पाहिजे, पण ते उकळलेलं नसावं. तर कोमट असावं.

व्यायामानंतरच्या चुका

वजन कमी करणाऱ्या काही लोकांना वाटतं की, व्यायाम करत असताना घाम जात असेल तर अनेक तास पाणी पिऊ नये. त्यांच्या मते असं केल्याने शरीरातील चरबी जळते. मात्र, एक्सपर्ट्सच्या मते, व्यायाम करताना मध्येमध्ये पाणी प्यायलं पाहिजे.

कार्ब्स न घेणं

रोज वर्क आऊट आणि डाएट केल्यानेही वजन कमी केलं जाऊ शकतं. मात्र, यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. यात केवळ प्रोटिन असणं पुरेसं नाहीये. तर त्यासोबत फळेही असावेत. त्यात कार्ब्सचं प्रमाणही पुरेसं असलं पाहिजे. मात्र, बहुतेक लोक प्रोटीनवरच अवलंबून असतात.

नाश्ता न करणे

वजन कमी करण्यासाठी हलका आहार घेतला पाहिजे. मात्र काही लोक नाश्ता करण्याचं रुटीनही फॉलो करतात. हेल्थ एक्सपर्टच्या मते, चुकूनही नाश्ता करू नये. तुम्ही वर्कआऊट करून नाश्ता केला तर तुमचं वजन कमी होईल. पण तुमच्या शरीराला अनेक आजार लागतील.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर