AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराची सात लक्षणे कोणती? वाचा सविस्तर

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार सध्या प्रचंड थैमान घालत आहे (symptoms of corona strain).

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराची सात लक्षणे कोणती? वाचा सविस्तर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 25, 2020 | 3:22 PM
Share

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार (Corona Strain) सध्या प्रचंड थैमान घालत आहे. संपूर्ण जगभरात त्याची दहशत आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नवा अवतार प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारे विमाने रद्द केले आहेत. या नव्या विषाणूला B.1.1.7 असं म्हटलं जात आहे. आधीच्या विषाणूपेक्षा हा विषाणू जास्त धोकादायक असल्याचा दावा करण्यात आला आहे (symptoms of corona strain).

आतापर्यंत कोरोना विषाणूचे ताप, कोरडा खोकला आणि चव किंवा गंध जाणे ही प्रमुख लक्षणे होते. मात्र, आता ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सात प्रमुख लक्षणे असल्याची माहिती समोर आली आहे (symptoms of corona strain).

कोरोना स्ट्रेनचे सात लक्षणे कोणती?

1. थकवा 2. भूक न लागणे 3. डोकेदुखी 4. जुलाब 5. मानसिक अस्वस्थता 6. स्नायूदुखी 7. छातीत दुखणे

कोरोनाच्या नव्या अवताराविषयी सविस्तर माहिती

कोरोना स्ट्रेन हे कोरोनानं घेतलेलं नवं रुप मानलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचं हे रुप पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचे जितके रुग्ण सापडले, त्यांच्या एक तृतीशांश लोकांमध्ये हा नवा कोरोना सापडला. तर डिसेंबर महिन्यात याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आणि सापडणाऱ्या 3 पैकी 2 रुग्णांमध्ये नवा विषाणू सापडू लागला. यावरुनच हा संसर्गाच्या बाबतीत अतिशय घातक असल्याचं समोर आलं. आधीच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक क्षमतेनं हा लोकांना संक्रमित करतो आहे. नॉर्दन आयर्लंड सोडलं तर सगळ्या ब्रिटनमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव झाल्याचं पाहायला मिळतंय.

नव्या कोरोना स्ट्रेनमुळे धोका वाढला?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना स्ट्रेनमुळे 3 गोष्टीत धोका वाढला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा विषाणू अतिशय जलदगतीनं दुसऱ्या विषाणूचं रुप घेतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या त्या भागात बदल होत आहेत, जे भाग संक्रमण पसरवण्यात अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या काही म्युटेशनमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हा नवा कोरोना विषाणू आधीपेक्षा शक्तीशाली आणि जलद गतीनं पसरणारा असल्याचं सांगितलं जातंय.

म्युटेट होणं म्हणजे काय?

म्युटेट होणं म्हणजे विषाणूच्या जेनेटिक मटेरिअलमध्ये होणारे सततचे बदल. कोरोना विषाणूत शास्त्रज्ञांना हजारो म्युटेशन सापडले आहेत. हे म्युटेशन वायरसच्या स्पाईक म्हणजेच त्याच्या काट्याच्या आकारातील रचनेत हा लपलेले असतात. हेच स्पाईक मानवी कोशिकांवर चिटकतात, आणि त्यातून हा विषाणू आपला प्रसार करतो.

कोरोना विषाणूने याआधीही रुपं बदलली आहेत?

याआधीही कोरोनाच्या विषाणूनं अनेक रुपं बदलली आहेत. आधी चीनच्या वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू हा आता जगभरात सापडणाऱ्या कोरोना विषाणूहून भिन्न आहे. D614G प्रकारातला विषाणू फेब्रुवारी महिन्यात युरोपात सापडला होता. आता जगभरात याच प्रकारचा कोरोना विषाणूच सर्वात जास्त सापडतो. A222V हा एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे, जो युरोपातच सापडला, हा त्या लोकांमध्ये सर्वाधिक सापडला, जे स्पेनमध्ये उन्हाळ्याची सुट्टीची मजा घेण्यासाठी गेले होते.

आता प्रश्न येतो ब्रिटनमध्ये हा प्रकार आला कुठून?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना स्ट्रेन हा कोरोनाचा बदललेला प्रकार अशा रुग्णांच्या शरीरात बदलला, ज्याची प्रतिकारशक्ती अतिशय कमी होती. ज्यामुळे हा विषाणू जिवंत राहिला. रुग्णाची प्रतिकारशक्ती त्याला संपवू शकली नाही. आणि त्यानं तिथंच रुप बदललं आणि पुन्हा संक्रमणाला सुरुवात केली. (Everything to know about New coronavirus strain in UK)

या कोरोना स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिक धोकादायक होईल?

सध्यातरी याचं कुठलंही प्रमाण नाही, मात्र यावर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याचं संक्रमणाचं प्रमाणं अधिक असल्यानं पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची लाट येईल. रुग्णालयं पुन्हा अपुरी पडू लागतील. आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या या नवीन प्रकारावर लस प्रभावी ठरणार?

ही गोष्ट आता निश्चित आहे की कोरोना लसीचा प्रभाव या कोरोना विषाणूवर नक्की होणार. ब्रिटनमध्ये सध्या ज्या 3 लसी दिल्या जात आहेत, या लसींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे जरी कोरोनानं रुप बदललं तरी ती नव्या कोरोना विषाणूवर हल्ला करते, आणि त्याला संपवते. भारतातही सीरमची लस या विषाणूला संपवण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

पण यामध्ये एक धोका आहे…

जर या विषाणूला म्युटेट होऊ दिलं, तर चिंता वाढू शकते. कारण, सध्या हा विषाणू लसीपासून वाचण्याच्या परिस्थितीत पोहचत आहे. लसीपासून वाचण्यासाठी विषाणू आपलं रुप बदलतो. त्यामुळे लस ही विषाणूवर प्रभावी ठरत नाही. आणि विषाणू आपलं संक्रमणाचं काम सुरु ठेवतो. त्यामुळेच आताचा कोरोनाचा स्ट्रेन अतिशय चिंतेची गोष्ट मानली जात आहे. जर कोरोनाने असे म्युटेन बनवले, की ज्यामुळे लस त्यावर प्रभावी ठरणार नाही. तर परिस्थिती गंभीर होईल, आणि त्यानंतर जगभरात फ्ल्यूसारखी परिस्थिती तयार होईल अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या एक चांगली गोष्ट ही की, सध्या ज्या लसी आहेत, त्यामध्ये कोरोनानं बदललेल्या रुपानुसार तातडीनं बदल करणं शक्य आहे. त्यामुळे विषाणूचा खात्मा करणं सोपं होईल असं लस निर्माते सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

ब्रिटनमध्ये कोरोना स्ट्रेनचा कहर सुरु; कुठल्या देशात काय बंद? भारतात काय परिस्थिती?

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!