AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारल्याचा रस पिण्याचे फायदे!

कारण यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीसारखे गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांना बळी पडण्यापासून ही वाचू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कारल्याचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत?

कारल्याचा रस पिण्याचे फायदे!
Bitter gourd juiceImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 30, 2023 | 3:42 PM
Share

कारल्याचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक जण त्याच्या रसाचे ही सेवन करतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी कारल्याच्या रसाचे सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. कारण यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीसारखे गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांना बळी पडण्यापासून ही वाचू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कारल्याचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत?

कारल्याचा रस पिण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत

कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. त्याचबरोबर जर तुम्ही रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्याबरोबरच तुमचा मेंदूही तेज होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यावा.

मधुमेहात फायदेशीर

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही कारल्याचे सेवन करावे. कारण कारल्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीर निरोगी राहते.

पचनसंस्था मजबूत

रिकाम्या पोटी कारल्याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते. यामध्ये असलेले फायबर तुमचे पोट निरोगी ठेवते. कारल्याचा रस प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत, त्यामुळे जर तुम्ही आधीच पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही कारल्याच्या रसाचे सेवन करू शकता.

 भूक नियंत्रित करणारे गुणधर्म

जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर रिकाम्या पोटी आहारात कारल्याच्या रसाचा समावेश करा. कारल्याच्या रसात भूक नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.