AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?

अमेरिकेतील संशोधनानुसार, दोन अग्रगण्य कोव्हिड लसींचे डोस मिसळल्याने काही जणांनी थकवा आणि डोकेदुखी यासारख्या साईड इफेक्ट्सच्या तक्रारी केल्या होत्या (mixing two corona vaccines)

Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?
corona vaccines
| Updated on: May 13, 2021 | 2:46 PM
Share

मुंबई : कोरोना प्रतिबंधक दोन लसींचे पर्याय सध्या भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute of India) कोव्हिशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशी भारतातील नागरिकांना दिल्या जातात. मात्र पहिला डोस एका लसीचा घेतल्यानंतर दुसरा डोस दुसऱ्याच कंपनीच्या लसीचा मिळाला तर? घ्यावा की घेऊ नये? दोन डोसचा कोर्स पुन्हा करावा लागेल का? लसींच्या कॉकटेलचा शरीरावर दुष्परिणाम होईल का? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरं पाहूया. (What happens after mixing two corona vaccines study shows mild side effects)

कॉकटेल लसींचे सौम्य साईड इफेक्ट्स

अमेरिकेतील संशोधनानुसार, दोन अग्रगण्य कोव्हिड लसींचे डोस मिसळल्याने काही जणांनी थकवा आणि डोकेदुखी यासारख्या साईड इफेक्ट्सच्या तक्रारी केल्या होत्या. प्राथमिक अभ्यासातील ही निरीक्षणं असली, तरी कॉकटेल लसीमुळे विषाणूपासून किती बचाव होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅस्ट्राझेनेकाचा (AstraZeneca) पहिला डोस घेतलेल्या काही नागरिकांना फायझर (Pfizer) लसीचा दुसरा डोस मिळाला. अशा व्यक्तींनी चार आठवड्यांनंतर सौम्य साईड इफेक्ट्स जाणवल्याचं सांगितलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातील (University of Oxford) संशोधकांनी लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये (Lancet medical journal) हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. या दोन्ही लसींपैकी कुठल्याही कंपनीचा डोस आधी घेतला असला, तरी या कॉकटेल लसींचे परिणाम सारखेच होते.

फ्रान्समध्ये नागरिकांना कॉकटेल लस

लसींच्या कमतरतेचा सामना कसा करावा यासाठी अनेक कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांनी दोन वेगवेगळ्या लसींचे मिश्रण करण्याची रणनीती आखली आहे, याचा संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी तपास करत आहेत. कॉकटेल लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याची हमी सरकारांना मिळाल्यास त्यांचा साठा व्यवस्थापित करणे सुलभ होईल. काही देशांमध्ये आधीच ही पद्धत वापरली गेली आहे. उदाहरणार्थ फ्रान्स सरकारने बंदी घालण्यापूर्वी वृद्ध रुग्णांना अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस मिळाला होता. आता त्यांना फायझर आणि बायोटेक एसई यांचे दुसरे डोस दिले जात आहेत.

कॉकटेल लसींचा विषाणूवरील परिणाम अस्पष्ट

“हे खरोखरच उत्साहवर्धक संशोधन आहे, ज्याची आपण अपेक्षा करत नव्हतो, असं नाही” असं या चाचणीचे नेतृत्व करणारे ऑक्सफर्ड बालरोगशास्त्र आणि लसीकरणशास्त्र प्राध्यापक मॅथ्यू स्नॅप म्हणाले. “हे सुधारित प्रतिजैविक प्रतिसादाशी (improved immune response) संबंधित आहे की नाही, हे आम्हाला अद्याप माहिती नाही; आम्ही काही आठवड्यांत त्यावर निष्कर्ष काढू” असंही ते म्हणाले.

कामात गैरहजेरी वाढू शकते

या अभ्यासानुसार कोणताही सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला नाही. काही दिवसांनंतर त्याचे तीव्र दुष्परिणामही (साईड इफेक्ट्स) नष्ट झाले, असे मॅथ्यू स्नॅप यांनी सांगितले. मात्र मिश्र डोसच्या लसीकरणानंतर साईड इफेक्ट्समुळे कामात गैरहजेरी वाढू शकते, अशा निष्कर्षावर स्नॅप आले. (mixing two corona vaccines)

संशोधनातील सहभागी 50 वर्षांवरील

संशोधनात असे दिसून आले आहे की मिश्रित डोस घेणाऱ्या सुमारे 10% व्यक्तींना तीव्र थकवा आला. तर एकाच प्रकारच्या लस घेणाऱ्या जवळपास 3% व्यक्तींना तसा त्रास झाला होता. अभ्यासातील सर्व सहभागी 50 आणि त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. स्नॅप यांच्या म्हणण्यानुसार, तरुण रुग्णांमध्ये या प्रतिक्रिया अधिक तीव्रही असू शकतात. संशोधक दोन डोस दरम्यानचा कालावधी 12 आठवड्यांपर्यंत विस्तृत करण्यावरही अभ्यास करत आहेत.

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डच्या कॉकटेलवर संशोधन नाही

सर्वंच लसी मिक्स डोसमुळे हाच परिणाम साधतील, असं नाही, यावरही संशोधकांचं एकमत झालं आहे. अद्याप भारतात उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन लसींच्या डोसवर संशोधन न झाल्यामुळे त्याचे परिणामही ऑक्सफर्डच्या निष्कर्षाप्रमाणेच असतील, हे बिनदिक्कतपणे सांगता येणार नाही.

संबंधित बातम्या :

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर आवश्यक, बाधितांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी : NTAGI

Covaxin | 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी, DCGI कडून भारत बायोटेकला परवानगी

(What happens after mixing two corona vaccines study shows mild side effects)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.