AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनाची चलबिचल होतेय? हा ‘बायपोलर डिसऑर्डर’चा प्रकार असू शकतो, दुर्लक्ष करु नका!

गेल्या काही वर्षांमध्ये ‘बाइपोलर डिसऑर्डर’च्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. हा एक मानसिक आजार असला तरी याची लक्षणे लवकर ओळखल्यास यावर उपचार करणे शक्य होत असते. त्यामुळे आपल्यालाही याची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मनाची चलबिचल होतेय? हा 'बायपोलर डिसऑर्डर'चा प्रकार असू शकतो, दुर्लक्ष करु नका!
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका!Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 8:05 PM
Share

बदलती जीवनशैली, ताण-तणाव आदींमुळे शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्यदेखील निरोगी ठेवणे एक मोठे आव्हान असते. गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कोरोना काळात अनेक जणांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य हा आजकालचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. त्यातच आता ‘बाइपोलर डिसऑर्डर’ची (bipolar disorder) अनेक प्रकरणे समोर येत आहे. दरवर्षी हजारो रोग या मानसिक समस्येपासून त्रस्त आहेत. ही एक मानसिक आरोग्याशी (mental health) संबंधित समस्या आहे. यात मॅनिक डिप्रेशनची (manic depression) व तणावामुळे रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. मॅनिकची लक्षणे साधारणत: दोन ते चार महिने तर डिप्रेशनची लक्षणे चार ते सहा महिन्यांपर्यंत कायम राहू शकतात. ही एक सामान्य मानसिक समस्या असल्याने अनेकदा रुग्ण यातून आपोआप सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु अनेकदा तणावात आत्महत्यादेखील करण्याचा प्रयत्न करीत असतो.

‘इन्टीट्युट ऑफ ह्युमन बिहॅवियर ॲन्ड अलाइड’ सायन्सचे वरिष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश यांनी सांगितले की, या आजाराची अनेक कारणे असू शकतात. शरीरातील काही रसायनांचा असमतोल तसेच अनेक वेळा आनुवंशिक पद्धतीमुळेही एकातून दुसऱ्या पिढीत हा आजार निर्माण होऊ शकतो. त्याच सोबत याची लक्षणे लवकर ओळखल्यास हा आजार आटोक्यात आणणे शक्य असते. अनेकदा तर या आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण रुग्णालयात जाण्याआधीच बरा होऊन जातो. योग्य आहार, व्यायाम, चांगली जीवनशैली आदींच्या माध्यमातून या आजारातून सहज सुटका करता येते.

कुठल्या वयात हा आजार भेडसावतो

हा आजार वयाच्या दोन टप्प्यात निर्माण होण्याची शक्यता डॉ. ओमप्रकाश यांनी वर्तविली आहे. यात २० ते ३० वयाचा पहिला टप्पा तर ४० ते ४५ वयाचा दुसऱ्या टप्प्याचा समावेश होत असतो. अनेकदा तर रुग्ण या आजाराने त्रस्त आहे, हेदेखील लवकर समजण्यास वेळ होत असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे वेळी ओळखणे आवश्यक असते. यात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांशी रुग्णाला मनमोकळ्या पद्धतीने बोलू द्यावे.

मॅनिक डिप्रेशनची लक्षणे

  1. अस्वस्थ वाटणे
  2. एका विचारातून अचानक दुसऱ्या विचारात जाणे
  3. कमी झोपणे
  4. सतत उदास वाटणे
  5. आत्महत्येचा विचार येणे
  6. थकल्यासारखे वाटणे
  7. निर्णय घेण्यास सक्षम नसणे

असा करा बचाव

  1. तणावापासून लांब रहा
  2. चांगली झोप घ्या
  3. आपले मन मोकळे करा
  4. आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

संबंधित बातम्या :

Mask Free Maharashtra : आता ज्या माणसाला मास्क वाटत असेल, त्याने लावावा आणि ज्याला वाटत नसेल त्यांना लावू नये

पोटाच्या विकारांपासून राहा दूर… आहारात ‘या’ सुपरफूडचा समावेश करा

Weight Loss: पोटाची नको असलेली चरबी बर्न करण्यासाठी हे 3 चहा अत्यंत फायदेशीर!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.