Health Tips | श्वास आणि धाप लागण्याची ‘ही’ असू शकतात कारणे, वाचा यावरचे उपाय…

एका मिनिटाच्या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त वेळा श्वास घेण्याच्या अवस्थेस धाप लागणे किंवा श्वास लागणे, असे म्हटले जाते. वेगाने श्वास घेण्याच्या या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये ‘हायपरवेन्टिलेशन’ म्हणतात.

Health Tips | श्वास आणि धाप लागण्याची ‘ही’ असू शकतात कारणे, वाचा यावरचे उपाय...
श्वास लागणे किंवा धाप लागणे
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:08 PM

मुंबई : एका मिनिटाच्या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त वेळा श्वास घेण्याच्या अवस्थेस धाप लागणे किंवा श्वास लागणे, असे म्हटले जाते. वेगाने श्वास घेण्याच्या या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये ‘हायपरवेन्टिलेशन’ म्हणतात. हार्ट फेल्युअर, फुफ्फुसाचा संसर्ग, गुदमरल्यासारखे वाटणे इत्यादी अवस्थेत, त्या व्यक्तीला डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू लागते. वास्तविक, धाप लागणे हा एक आजार नाही. मात्र, हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते (What is hyperventilation and panting know the reasons and precautions).

श्वास लागण्याची कारणे

सीओपीडी

हा फुफ्फुसाचा एक सामान्य आजार आहे, ज्यामध्ये ब्राँकायटिससारख्या समस्यांमुळे फुफ्फुसामध्ये जळजळ होते आणि त्यातील एन्सेफेसमध्ये असलेल्या लहान-लहान हवेच्या पिशव्या नष्ट होतात.

दमा

वारंवार श्वास घेणे देखील दम्याचा आजार होण्याचे लक्षण असू शकते. श्वास नलिकेमध्ये सूज आल्याने एखाद्या व्यक्तीला श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू शकते.

शरीरात पाण्याचा अभाव

शरीरात पाण्याच्या अभाव निर्माण झाल्यास श्वासाचा मार्गही बदलतो. पाण्याअभावी, शरीरातील पेशींना पुरेशी उर्जा मिळत नाही आणि डिहायड्रेशनसारख्या समस्यांमुळे ती व्यक्ती धापा टाकू लागते.

रक्ताच्या गुठळ्या

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पल्मोनरी एम्बोलिझमची समस्या उद्भवते, तेव्हा फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. ज्यामुळे त्या व्यक्तीला छातीत दुखणे, हृदयाची गती वेगवान होणे, श्वासोच्छवासाच्या तक्रारी उद्भवू लागतात (What is hyperventilation and panting know the reasons and precautions).

इन्फेक्शन्स

न्यूमोनियासारख्या फुफ्फुसांना संसर्गित होणारे आजार श्वास घेण्यात अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे त्या व्यक्तीला धापा लागू शकतात. जर या संसर्गावर बराच काळ उपचार झाला नाही तर, तर फुफ्फुसात द्रव भरला जातो आणि त्या व्यक्तीस श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

श्वास लागण्याची कारणे

– घशात आणि फुफ्फुसांमध्ये जळजळ होणे

– डोळ्यांतून पाणी येणे

– चक्कर येणे किंवा अशक्तपणा

– श्वास घेताना आवाज येणे

– हृदयाची गती वाढणे

कसे टाळाल ही समस्या

– अल्कोहोल आणि धूम्रपान यासारख्या फुफ्फुसांच्या आरोग्यास हानी पोचवणाऱ्या सवयी टाळा.

– कपालाभाती, प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम सारख्या साध्या प्राणायामातून ही समस्या दूर केली जाऊ शकते.

– नियमित व्यायामामुळे हायपरव्हेंटिलेशनची समस्या देखील रोखली जाऊ शकते.

– जर तुम्हाला पॅनीक अटॅक वाटत असेल, तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

(What is hyperventilation and panting know the reasons and precautions)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.