गव्हाचे पीठ प्रथिने आणि फायबरने समृद्ध हवे असल्यास गहू दळताना त्यात मिक्स करा फक्त ‘ही’ एक गोष्ट

गव्हाचे पीठ हे भारतीय घरांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे पीठ आहे. कारण चपात्यांशिवाय जेवण अपूर्ण आहे. तुम्हाला जर चपात्या पौष्टिक बनवायच्या असतील तर गहु दळताना त्यात हे एक घटक मिक्स करा. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

गव्हाचे पीठ प्रथिने आणि फायबरने समृद्ध हवे असल्यास गहू दळताना त्यात मिक्स करा फक्त ही एक गोष्ट
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 4:11 PM

आपल्या प्रत्येक भारतीय घरांमध्ये आहारात गव्हाचे पीठ हे सर्वात जास्त वापरले जाणारे पीठ आहे. कारण गव्हाच्या पोळीशिवाय जेवण हे अपूर्णच आहे. तर आपल्यापैकी अनेकजण बाजारातून आधीच दळलेले पीठ खरेदी करतात, तर काही लोकं गहू खरेदी करून गिरणीत दळतात. गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, बी जीवनसत्त्वे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असतात. मात्र गव्हाच्या पीठात फायबरचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे ते पचनक्रिया किंवा वजन कमी करण्यास मदत करत नाही. तर गव्हाचे हे पीठ फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध करण्याचा एक मार्ग आहे.

तुम्ही जेव्हा गहू खरेदी करून दळण्यासाठी देता तेव्हा फक्त दळण्याआधी गव्हामध्ये फक्त हे एक घटक मिक्स करा. यामुळे गव्हाचे तयार पीठ फायबरने समृद्ध होईल आणि दुप्पट आरोग्य फायदे देखील तुमच्या आरोग्याला मिळतील. फायबरने समृद्ध हे पीठ पचन सुधारेल, वजन कमी करण्यास मदत करेल आणि तुमची ऊर्जा वाढवेल. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास घटकाबद्दल जाणून घेऊयात.

गव्हाच्या पिठात हे घटक करा मिक्स

गहू दळताना त्यामध्ये काळे चणे मिक्स करा. काळे चणे गव्हाच्या पिठाला फायबर आणि प्रथिने समृद्ध करतात. सर्वांना माहित आहे की काळे चणे किती पौष्टिक आहेत आणि आरोग्यासाठी ते एक सुपरफूड मानले जातात. 100 ग्रॅम सुकलेल्या काळ्या चण्यामध्ये अंदाजे 12 ते 13 ग्रॅम फायबर असते.

पौष्टिकतेने समृद्ध काळे चणे

फायबर व्यतिरिक्त या चण्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम सारखे असंख्य पोषक घटक असतात, जे पचनास मदत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात. काळे चण्यांचे आहारात समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जा आणि ताकद देखील वाढते. जेव्हा तुम्ही गव्हासोबत काळे चणे मिक्स करून दळता तेव्हा पीठ दुप्पट पोषणाने भरलेले असते. त्यापासून बनवलेली चपाती व रोटी खाल्ल्याने तुमच्या शरीराला असंख्य फायदे होतात.

या गव्हाच्या पीठाची चपाती खाण्याचे फायदे

वजन कमी करण्यास मदत होते – या पीठात प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ही चपाती खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. अशाने एखादी व्यक्ती वारंवार खाणे टाळते आणि त्यांचे वजन नियंत्रणात राहते.

रक्तातील साखरेचे नियंत्रण – गव्हासोबत काळे चणे बारीक केल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, ज्यामुळे हे पीठ मधुमेहींसाठी योग्य बनते. त्यापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचन सुधारते – काळ्या चण्याच्या गव्हाच्या पिठाच्या चपातीमुळे पचन सुधारते. फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले – या पीठात असलेल्या फायबर आणि पोटॅशियममुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

शक्ती आणि ऊर्जा प्रदान करते – कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऊर्जा वाढते, ज्यामुळे शरीराला शक्ती मिळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)