AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health advice : इंटरकोर्सनंतर लगेच यूरीन पास करणे का आहे आवश्यक? महिलांनी घ्यावी ‘या’ गोष्टीची विशेष काळजी!

इंटरकोर्सनंतर लगेच यूरीन (Urine) न करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक होऊ शकते. यामुळे युरिन इन्फेक्शनसह महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत संभोगानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Health advice : इंटरकोर्सनंतर लगेच यूरीन पास करणे का आहे आवश्यक? महिलांनी घ्यावी ‘या’ गोष्टीची विशेष काळजी!
Image Credit source: Aajtak
| Updated on: Jul 10, 2022 | 1:17 PM
Share

तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध बनवताना तुमच्या इंटरनल स्वच्छतेची (Internal hygiene) काळजी घेणे फार महत्वाचे असते. जर तुम्ही इंटरनल स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण त्यानंतर केलेल्या काही चुका तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. अनेकांना शारीरीक संबधानंतर (After  intercourse) लगेच झोप येते. जे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. संभोगानंतर यूरीन पास करणे फार महत्वाचे आहे. लैंगिक संबधानंतर लघवी करणे स्त्रियांसाठी खूप महत्वाचे आहे, कारण महिलांचे मूत्रमार्ग लहान असते. ज्यामुळे बॅक्टेरिया सहज पसरू शकतात. संभोग करताना पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये असलेले बॅक्टेरिया (Bacteria) महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सहज प्रवेश करतात. अशा स्थितीत संभोगानंतर लगेच यूरीन पास केल्याने हे बॅक्टेरिया निघून जातात.

युरिन इन्फेक्शनचा धोका असतो

अनेक महिलांना इंटरकोर्सनंतर यूरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. कारण संभोग करताना महिलांच्या मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते. याचे कारण म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना यूटीआयचा धोका जास्त असतो. स्त्रियांमध्ये, मूत्रमार्ग (ज्या नळीतून लघवी जाते) पुरुषांपेक्षा खूपच लहान असते. त्यामुळे बॅक्टेरिया मूत्रमार्गात सहज प्रवेश करतात. यासाठी तुम्ही संभोगानंतर लगेचच प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे.

इंटरकोर्सनंतर स्वच्छता आवश्यक

इंटरकोर्सनंतर 30 मिनिटांच्या आत यूरीन पास करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जास्त वेळ थांबल्यास, बॅक्टेरिया तुमच्या मूत्रमार्गात सहज प्रवेश करू शकतात. यासाठी प्रायव्हेट पार्टही स्वच्छ करणे आवश्यक आहे.

पुरुषांना आवश्यक आहे का?

जर पुरुषांनी संभोगानंतर यूरीन पास केले नाही तर, त्यामुळे त्यांना काही नुकसान होत नाही. पुरुषांची मूत्रमार्ग महिलांपेक्षा लांब असल्यामुळे, संभोगानंतर संसर्गाचा धोका नगण्य असतो.

गर्भधारणा होऊ शकत नाही का?

जर तुम्हाला वाटत असेल की सेक्स केल्यानंतर लघवी केल्याने गर्भधारणा टाळता येते, तर तुम्ही चुकीचे आहात. जर तुम्हाला गर्भधारणा टाळायची असेल तर तुम्हाला सुरक्षित संभोगाचा मार्ग निवडावा लागेल. पण जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल तर, संभोगानंतर लघवी केल्याने तुमच्या गर्भधारणेवर कोणताही परिणाम होणार नाही. गर्भधारणेसाठी, शुक्राणूंना योनीतून फॅलोपियन ट्यूबपर्यंत प्रवास करणे आवश्यक आहे. योनी मूत्रमार्गापासून वेगळी असते, त्यामुळे संभोगानंतर लघवी केल्याने तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होत नाही.

इंटरकोर्सनंतर लघवी करताना जळजळ होणे

इंटरकोर्सनंतर अनेक महिलांना लघवी करताना जळजळ जाणवते. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला युरिन इन्फेक्शन आहे. लघवी करताना जळजळ होण्याची लक्षणे काही वेळा UTI सारखीच असतात. पण एक-दोन दिवसांत ते स्वतःहून चांगले होते. परंतु, इंटरकोर्सनंतर 2 दिवसांनंतरही लघवी करताना जळजळ होत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.