AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcoholic fatty liver: दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब, ‘या’ प्राथमिक लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

Fatty Liver Warning Sign : फॅटी लिव्हरचा आजार आजच्या काळात सामान्य झाला आहे. जे, लोक जास्त दारू पितात, अशा लोकांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Fatty liver disease) होण्याची शक्यता असते. शरीरात सुप्तावस्थेत वाढणाऱ्या या आजाराची काही धोक्याची लक्षणे आहेत जी सुरवातीला दिसत नाहीत.

Alcoholic fatty liver: दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब, ‘या’ प्राथमिक लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
दारू प्यायल्याने ‘लिव्हर’ होत आहे खराब
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 09, 2022 | 6:35 PM
Share

फॅटी लिव्हर डिसीज हा एक आजार आहे. ज्यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये जास्त चरबी (Excess fat) जमा होते. या आजारामुळे यकृत नीट काम करू शकत नाही. आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती या आजाराची लागण झालेला आढळून येत आहे. कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, मधुमेह, स्लीप एपनिया, सुप्तावस्थेतील ‘थायरॉईड’ हे फॅटी लिव्हर आजारामुळे हेावू शकतात. फॅटीलिवर रोगाला स्टीटोसिस(Steatosis) देखील म्हणतात. फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. नॉन-अल्कोहोलिक आणि अल्कोहोल. जे, लोक जास्त दारू पितात, अशा लोकांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Fatty liver disease) होण्याची शक्यता असते. यकृत पूर्णपणे खराब झाल्यावर या आजाराची लक्षणे दिसतात. शौचातुन रक्त येणे हे त्याचे प्रारंभिक लक्षण आहे. असे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

काय? आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज

यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे जो कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करतो. विषारी पदार्थ फिल्टर करतो, पचनास मदत करतो आणि संसर्ग नियंत्रित करतो. अनियंत्रित मद्यपानामुळे यकृताच्या पेशी खराब होतात. यकृत स्वतःच बरे होत असले तरी जर कोणी सतत जास्त दारू प्यायले तर ही क्षमताही संपते.

अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे संकेत

ऑलीओ लुसोचे वैद्यकीय संचालक डॉ. मोनिका वासरमन यांच्या मते, “अति मद्यपान केल्याने शरीराचे लक्षणीय नुकसान होऊ शकते. जास्त मद्यपान केल्याने यकृताच्या ऊतींचे नुकसान होते. ज्यामुळे शौचातून रक्त येऊ शकते. “आणि यकृताचे सामान्य कार्य बाधित होते. जे लोक भरपूर दारू पितात, त्यांच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि त्यांना सूज येते. त्यामुळे शौचातून रक्त येते.”

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग असा टाळावा

आपल्या जीवनशैलीत बदल करून फॅटी लिव्हरचे आजार टाळता येऊ शकतात किंवा कमी करता येतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक माणसाच्या निरोगी यकृतामध्ये थोड्या प्रमाणात चरबी असते, परंतु जेव्हा हे प्रमाण यकृताच्या एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पोहचते तेव्हा समस्या उद्भवते. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग अतिमद्य प्राशनामुळे होतो, म्हणून ते टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे दारू पिणे बंद करणे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही दर आठवड्याला 14 युनिटपेक्षा जास्त अल्कोहोल न पिण्याचा सल्ला दिला जातो. हे प्रमाण दहा लहान ग्लास ‘लो-अल्कोहोल’ वाइनच्या सममूल्य आहे. या प्रमाणात अल्कोहोल तीन दिवसात प्यावे. जर तुम्ही वर्षानुवर्षे जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर ते कमी करणे किंवा बंद करणे चांगले.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?