AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soacked Almond Benefits: तुम्ही पण सकाळी बदाम खाताय का? ‘या’ पद्धतीनं खा आणि आरोग्यदायी फायदे मिळवा….

benefits of eating soaked almonds empty stomach: बदाम तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदाममध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात जे शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहेत. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतात.

Soacked Almond Benefits: तुम्ही पण सकाळी बदाम खाताय का? 'या' पद्धतीनं खा आणि आरोग्यदायी फायदे मिळवा....
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 2:53 PM
Share

बदाम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. बदाममध्ये अनेक प्रकारचे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते ज्यांच्यामुळे आपल्या आरोग्याला फायदे होतात. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला पोषक घटक मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फयदे होतात. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येकाने दररोज सकाळी बदाम भिजवलेले बदाम खावेत. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.

अभ्यासानुसार, एक चतुर्थांश कप बदामामध्ये 6 ग्रॅम प्रथिने, 152 कॅररिज, 14 ग्राम फॅट, 6 ग्राम कार्बोहायड्रेट्स, 3 ग्राम डायटरी फायबर आणि 1 ग्राम साखर असते. तज्ञांच्या मते, बदाममध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम देखील असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मिळालेल्या आव्हालानुसार, तुम्ही दिवसभरामध्ये 8-10 बदाम खाऊ शकतात. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यालाच नाही तर तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात.

तुम्ही नियमित बदामाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यास मदत होते. बदाम खाल्ल्यामुळे लिपोप्रोटीन नावाच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच लिपोप्रोटीनची पातळी वाढण्यास मदत होते. बदामामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि हृदय विकाराचा धोका दूर होतो.

बदाममध्ये चांगले कॅलरीज भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे तुमच्या शरीरातील वजन नियंत्रित राहाते आणि लठ्ठपणाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बदाममध्ये प्रथिने आणि फायबर आढळतात ज्यामुळे तुमचे पोट नेहमी भरल्यासारखे वाटते आणि तुमच्या शरीरातील कॅलरीजची पातळी नियंत्रित राहाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी बदामचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते. क्यासोबतच बदममध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आमि फायबर जास्त प्रमाणात असते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.

बदामाचे सेवन तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. बदाममध्ये आढळणारे पोषक घटक तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात, त्वचा मऊ करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर ठेवतात. आता अनेकांना प्रश्न पडतो की बदमाचे सेवन कसे करावे? तुम्ही बदामाचे सेवन कच्चे, भिजवलेले किंवा भजून खाऊ शकतात. रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्यामध्ये पोषक तत्वांची अधिक वाढ होते. त्यामुळे भिजवलेल्या बदामाचे सेवन करून तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्ही बदाम नाशत्यामध्ये, दहीमध्ये, सॅलेडमघ्ये खाऊ शकता.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.