महिलांनी दररोज रिकाम्या पोटी पाण्यात मिक्स करून ‘या’ 2 गोष्टी खाव्यात, अशक्तपणा होईल दूर
महिलांमध्ये अशक्तपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे, जर तुम्हालाही यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर पोषणतज्ञ दीपशिखा जैन यांनी सांगितलेल्या या दोन गोष्टी दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास तुम्हाला कधीच अशक्तपणा जाणवणार नाही.

चांगले आरोग्यासाठी आपण हेल्दी आहाराचे सेवन करत असतो. जेणेकरून आपल्या शरीराला याचे योग्य पोषण तसेच घटक मिळावेत. परंतु काही महिलांना त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवत असते. जेव्हा लोहाची कमतरता भासू लागते तेव्हा अशक्तपणा जाणवतो. कारण जेव्हा योग्य प्रमाणात लोहयुक्त पदार्थांचे सेवन केले जात नाही तेव्हा अशक्तपणा ही समस्या निर्माण होते. तर यावर मात करण्यासाठी, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी), बीट, डाळिंब, सफरचंद, खजूर, मनुका आणि गूळ यांसारखे लोहयुक्त पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करावेत. तथापि, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिला त्यांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत. पण जीवनशैलीत छोटे बदल करून तुम्ही अशक्तपणावर मात करू शकता.
यावेळी पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका पेयाबद्दल सांगितले आहे, जे महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की, महिला अशक्तपणावर मात करण्यासाठी हलीम बिया आणि लिंबाचा रस वापरू शकतात. हलीमच्या बियांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, जे रक्तासाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे लोहाचे शोषण वाढवते.
View this post on Instagram
अशक्तपणावर मात करण्यासाठी हे पेय कसे तयार करावे?
तर हे पेय बनवण्याची पद्धत खुप सोपी आहे. रात्री एक चमचा हलीम बिया एका ग्लास पाण्यात भिजवा. नंतर सकाळी हे पाणी पिण्यापूर्वी त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा आणि नंतर ते रिकाम्या पोटी प्या. पोषणतज्ञ दीपशिखा जैन यांनी असेही सांगितले की, दररोज हे पाणी प्यायल्याने महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही आणि त्यामुळे लोहाचे प्रमाणही वाढेल.
हलीम बियांचे फायदे जाणून घ्या
हलीमच्या बियांना गार्डन क्रेस सीड्स आणि अलिव सीड्स असेही म्हणतात. या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे अशक्तपणावर मात करण्यास मदत करतात आणि महिलांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जातात.
हलीमच्या बिया हाडे मजबूत करतात, पचनक्रिया चांगली ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. हे मासिक पाळीच्या वेदना आणि अनियमिततेमध्ये देखील आराम देऊ शकते. दररोज कमी प्रमाणात हलीम बियांचे आणि लिंबू यांचे पाणी प्यायल्याने शरीराला भरपूर पोषण मिळते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)