AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाची चरबी कमी करणारे ‘हे’ पिवळ्या रंगाचे पदार्थ!

वजन कमी करण्यासाठी सामान्यत: प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञच्या मते, जर आपण आहारात काही पिवळ्या पदार्थांचा समावेश केला तर वाढते वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.

पोटाची चरबी कमी करणारे 'हे' पिवळ्या रंगाचे पदार्थ!
Yellow fruitsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 03, 2023 | 11:07 AM
Share

मुंबई: शारीरिक हालचालींच्या कमतरतेबरोबरच वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे योग्य आहार न घेणे, जर आपण नियमित निरोगी पदार्थ खाल्ले तर वजन कमी होणारच. वजन कमी करण्यासाठी सामान्यत: प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञच्या मते, जर आपण आहारात काही पिवळ्या पदार्थांचा समावेश केला तर वाढते वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यास मदत करणारे पिवळे पदार्थ

1. लिंबू

लिंबूचे अनेक फायदे आहेत, परंतु आपण वजन कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता, हे व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे, ज्याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चयापचय देखील वाढते. आपण पेय आणि कोशिंबीर म्हणून त्याचे सेवन करू शकता.

2. आले

आल्याचा वापर आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच केला जातो, या मसाल्याच्या माध्यमातून अनेक पाककृतींची चव वाढवता येते. याच्या मदतीने ड्रिंक तयार केल्यास वाढते वजन बऱ्याच अंशी कमी होईल. त्यासाठी एक ग्लास पाणी गरम करून आले त्यात मिसळा. सकाळी ते प्या, काही दिवसात इच्छित परिणाम येण्यास सुरवात होईल.

3. पिवळी शिमला मिरची

हिरवी शिमला मिरची तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, एकदा पिवळी शिमला मिरची ट्राय करा. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे पोट आणि कंबरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. यात असलेल्या फायबरमुळे मेटाबॉलिझम रेट सुधारतो. काही लोक ते भाजीप्रमाणे शिजवतात किंवा ते कोशिंबीर म्हणून देखील खाल्ले जाऊ शकते.

4. केळी

केळी हे एक अतिशय सामान्य फळ आहे जे जवळजवळ सर्वांनाच आवडते, केळी खाल्ल्याने वजन नक्कीच कमी होते, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की ते मर्यादित प्रमाणात खावे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि आपण जास्त प्रमाणात खाणे टाळता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?