AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Fitness पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनसचे हे खास राज, तुम्हीही करा फॉलो!

पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विटद्वारे किंवा अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे. तर आता आपण पंतप्रधान मोदींच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेणार आहोत.

PM Modi Fitness  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनसचे हे खास राज, तुम्हीही करा फॉलो!
Image Credit source: freepik
| Updated on: Sep 17, 2023 | 12:07 AM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय जरी जास्त असलं तरी त्यांचा फिटनेस आणि एनर्जी वाखण्याजोगी आहे. पंतप्रधान मोदींचा फिटनेस पाहून आजच्या तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. वय झालं असतानाही पंतप्रधान मोदी आजही फिट आणि तंदुरुस्त आहेत. तसेच पंतप्रधान हे नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात तरीदेखील त्यांचा फिटनेस अजूनही कायम कसा काय? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो.

योग निद्रा करणे – पंतप्रधान मोदी नेहमीच कामात व्यस्त असलेले दिसतात त्यामुळे त्यांचे झोपही पूर्ण होत नाही. तरी देखील ते एकदम फ्रेश कसे काय दिसतात? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर याबाबत त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, ध्यानाचे आसन करताना आपले शरीर झोपेत जाते परंतु ही झोप एवढी प्रभावी असते की यामधून आपले शरीर रिचार्ज होते आणि काम करण्याची मानसिक क्षमता आपली मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी पंतप्रधान मोदी आठवड्यातून दोनदा योग निद्रा नियमित करतात.

वाघारेली खिचडीचा आहारात समावेश- पंतप्रधान मोदींना आपण जेव्हाही पाहतो तेव्हा ते फ्रेश आणि एकदम तंदुरुस्त दिसतात. तर याचं रहस्य आहे वाघारेली खिचडी. पंतप्रधान मोदी गुजरातची प्रसिद्ध वाघारेली खिचडी खातात. त्यांना ही खिचडी भरपूर आवडते. ही खिचडी तांदूळ, मुग, हळद, डाळ आणि मीठ यापासून बनवली जाते. ही खिचडी खाल्ल्याने आपल्याला प्रथिने मिळतात जे आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात.

पंचतत्व योगाने दिवसाची सुरुवात- पंतप्रधान मोदी हे त्यांच्या दिवसाची सुरुवात योगा करूनच करतात. ते पंचतत्व योगा दररोज न चुकता करतात. पंचतत्व योगा म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांची संबंधित असलेला योगा. हा योगा करताना पंतप्रधान मोदी विरुद्ध दिशेने चालतात, खडकांवर चालतात किंवा चिखलात चालतात तसेच खडकांवरती ते पाठीवरती झोपतात. अशा प्रकारे हा योगा ते करतात. हा योगा केल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.

हळदीचे सेवन – पंतप्रधान मोदी आजारांपासून सुटका करण्यासाठी दररोज हळदीचे सेवन करतात.  कारण, हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल गुण असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी देखील हळदीचे सेवन नेहमी करतात.

*Disclaimer : वरील दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही*

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.