AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga : लहान मुलांनी योगा करावा की नाही? कितव्या वर्षी करावा? पाहा काय सांगतात योगतज्ज्ञ?

Yoga For Kids : गेल्या काही वर्षांपासून लोक योगा करत आहेत. मात्र लहान मुलांसाठी योगा सुरू करण्यापूर्वी काही टिप्स पाळल्या पाहिजेत. नेमक्या कोणत्या आहेत त्या जाणून घ्या.

Yoga : लहान मुलांनी योगा करावा की नाही? कितव्या वर्षी करावा? पाहा काय सांगतात योगतज्ज्ञ?
| Edited By: | Updated on: Jun 19, 2024 | 7:14 PM
Share

Health : योगा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. योगा केल्यामुळे आपले शारीरिक आरोग्य चांगले राहते. सोबतच आपले मानसिक आरोग्य ही उत्तम राहते. योगा हा सर्व वयोगटातील लोक करू शकतात. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी योगा फायदेशीर आहे. यामुळे लहान मुलांचा फोकस वाढतो आणि त्यांचे मन तीक्ष्ण होते. योगा हा लहान मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी खूप आवश्यक आहे.

21 जून रोजी 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. तर योगा हा फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील केला जात आहे. योग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 5वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले योगा करू शकतात.

योगासन सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधा. सगळ्यात आधी त्यांना योगाच्या सोप्या पायऱ्या सांगा. कोब्रा पोज, बटरफ्लाय, ट्री पोज या पोजमधून लहान मुलांना योगासनांची ओळख करून दिली जाऊ शकते. त्यासोबतच योगा करताना लक्ष केंद्रित कसे करावे याबाबतही त्यांना सांगावे. त

योगा करण्यापूर्वी मुलांनी श्वासोच्छवासाचे व्यायाम केले पाहिजेत. बन्नी ब्रीद, बेली ब्रीदिंग, फ्लॉवर ब्रीद यासारखे श्वासोच्छवासाचे व्यायाम मुलांनी केले पाहिजेत. त्यासाठी मुलांना दीर्घ श्वास घेण्यास सांगा  नंतर हळूहळू श्वास सोडण्यास सांगा. श्वासोच्छवासामुळे मुलांचे लक्ष आणि भावनिक नियमन कौशल्य वाढते.

मुलांचा एक गट बनवा आणि त्यांना योगा करायला शिकवा. त्यामुळे टीम वर्कने कसं काम करता हे त्यांना लक्षात येईल. एकत्र काम केल्याने मुलांमध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना वाढते. त्यामुळे रिलेशनही चांगले होण्यास मदत होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.