AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या तिशीतच गुडघ्यातून येतोय कट-कट आवाज ? हे उपाय करून पहा

कमी वयातच गुडघेदुखी किंवा सांध्यांमधून आवाज येणं हा आजकाल कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वेळीच लक्ष देऊन उपाय करणे उत्तम ठरते.

अवघ्या तिशीतच गुडघ्यातून येतोय कट-कट आवाज ? हे उपाय करून पहा
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 22, 2023 | 12:12 PM
Share

नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : जसंजसं आपलं वय वाढत जातं, आपल्या शरीराचे, आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम्स (health problems) डोकं वर काढू लागतात. हे सामान्य असलं तरी कधी-कधी या समस्या तरूण वयातही होऊ शकतात व त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. गेल्या काही काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या तरुण वयातील लोकांना जास्त प्रभावित करताना दिसत आहेत. तसेच वयाच्या तिशीतच गुडघेदुखी (knee pain)  किंवा सांध्यामधून कट-कट आवाजही येऊ लागतो.

मात्र या दुखण्याला सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात खूपच जड जाऊ शकते. तरूण वयात हाडांचा असा प्रॉब्लेम होणे खूप धक्कादायक आहे. अशा वेळी गुडघ्यांमधील वंगण किंवा ग्रीस नैसर्गिकरित्या कसे वाढवावे ते जाणून घेऊया.

का येतो गुडघ्यामधून आवाज ?

एकेकाळी वृद्ध व्यक्ती या त्यांचे गुडघे किंवा सांधे दुखण्याची तक्रार करत असत. पण आता तर तरूणांनाही हा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गुडघ्यांमधील ग्रीस किंवा वंगण कमी झाले की गुडघे दुखी वाढते किंवा कट कट आवाज येऊ लागतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की असा त्रास होतो. हे ग्रीस कमी झाल्यामुळे त्यातून फक्त आवाजच येत नाही तर खाली बसताना- उठताना किंवा झोपतानाही त्या व्यक्तीला त्रास होतो. गुडघ्यांमधील हे वंगण वाढवण्यासाठी लोकं काही औषधांची किंवा इंजेक्शनची मदत घेतात, पण हे नैसर्गिकरित्याही वाढवता येऊ शकते.

आहारात करा हेल्दी पदार्थांचा समावेश

निरोगी राहाचे असेल तर त्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सकस आहाराचे रूटीन फॉलो करावे, पण त्यामध्ये सर्व मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतीलच असे नाही ना. तसेच ओमेगा ३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाण्याची सवय लावावी. या पौष्टिक तत्वांव्यतिरिक्त अँटी-ऑक्सीडेंट्स असलेले पदार्थही मुबलक खावेत. गुडघ्यांमधील ग्रीस वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता. पण ते मर्यादित प्रमाणातच खावेत.

कॅल्शिअमचे सेवन

शरीरात एकदा कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर ती भरून काढणे, खूप कठीण होते. नैसर्गिकरित्या कॅल्शिअम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खावेत. पण फुल क्रीमने बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. तसेच याशिवाय व्हिटॅमिन डीच्या सेवनासाठी काही वेळ उन्हातही बसावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले