मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

मासिक पाळीच्या दिवसात तरुणींना मानसिक आणि शारिरीक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या दिवसांमध्ये शरीरात झालेल्या हार्मोन्स बदलामुळे कंबर, ओटीपोट, अगदी डोकं सुद्धा दुखतं. अनेक तरुणींना, महिलांना या दिवसात मूड स्विंगचा त्रास पण होतो. अशा वेळी अल्कोहोलचं सेवन किती योग्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय...थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 2:26 PM

मासिक पाळी हे महिलांना दिलेलं वरदान आहे असं म्हणतात. महिन्यातील ते पाच दिवस महिलांसाठी फार कष्टाचे असतात. आजच्या धावपळीच्या जगात महिलांना घर आणि नोकरी या गोष्टी सांभाळत असतात. त्यामुळे महिन्यातील या 5 दिवसात महिलांना आराम मिळत नाही. आज सोशल लाईफमध्ये महिलांसुद्धा अकोल्होलचं सेवन करायला लागल्या आहेत. मग प्रश्न येतो की मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होल सेवन केल्याने त्रास होतो का? या दिवसांमध्ये अकोल्होलचे सेवन योग्य आहे की अयोग्य? तर तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन करणे चुकीचे आहे. त्याची त्यांनी अनेक कारणं सांगितली आहेत. आपण पण जाणून घेऊयात काय आहेत ती कारणं.

1. पोटात कळा येणे तुम्ही मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचे सेवन करत असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. या दिवसात महिलांना पोटात क्रॅम्प्स येतात. आणि या डिहायड्रेशनमुळे तुम्हाला जास्त क्रॅम्पसचा त्रास होऊ शकतो.

2. मूड खराब होणे मासिक पाळीच्या दिवसात महिलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात, त्यामुळे याचा परिणाम त्याचा मूडवर होतो. अशामध्ये जर आपण अकोल्होलचं सेवन केलं तर अकोल्होलमुळेही आपल्या शरीरात हार्मोन्स बदलतात. आणि याचा परिणाम तुमचं मूड जास्त खराब होण्याची शक्यता असते.

3. मॅग्नेशियमवर परिणाम मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियम स्तरावर परिणाम होतो. शरीरातील इतर खजिनांवरही अकोल्होलचा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही अकोल्होलचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाली तर शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. आणि अशातून तुम्हाला इतर आजाराला समोरे जाण्याची भीती असते.

4. हार्मोन्सवर परिणाम मासिक पाळीच्या दिवसात अकोल्होलचं सेवन केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर दिसून येतात. शरीरातील एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स वाढण्याची भीती असते. याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांवर होऊ शकतो. विशेष म्हणजे अनियमित मासिक पाळीचा धोकाही वाढतो.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.