
Donald Trump Security : टॅरिफच्या निर्णयामुळे सध्या जगभरात चर्चेत असलेली अमेरिका आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत अचानक कडेकोट वाढ करण्यात आली आहे. त्यामागचं कारणंही तसंच चिंताजनक आहे.ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि प्रसिद्ध कंझर्व्हेटिव्ह ॲक्टिव्हिस्ट चार्ली कर्क यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या खळबळजनक हत्येमुळे सर्वांनाच हादरा बसला आहे.
गुरुवारी, 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेला पारंपारिक समारंभ पहिल्यांदाच पेंटागॉनच्या बाहेरील भिंतींवरून आतल्या सुरक्षित जागेत हलवण्यात आला. एवढेच नव्हे तर न्यू यॉर्कमधील यांकी स्टेडियममध्ये झालेल्या बेसबॉल सामन्यात ट्रम्प यांच्या उपस्थितीदरम्यान ब्रॉन्क्स परिसरात अभेद्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ट्रम्प यांच्या हत्येचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत, त्यामुळे हे उपाय आवश्यक आहेत. ट्र मात्र, त्यावेळी ते नशीबवान होते आणि गोळी त्यांच्या कानाला लागली, तर त्यांचा हल्लेखोर मारला गेला. मात्र कर्क यांच्या हत्येमुळे आता ट्रम्प पुन्हा निशाण्यावर असू शकतात, असी शक्यता वर्तवली जात असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा कडेकोट वाढवण्यात आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, स्टेडियमच्या प्रत्येक गेटवर विशेष स्कॅनिंग करण्यात आले होते. ट्रम्पच्या बॉक्सभोवती अतिरिक्त सुरक्षा आणि गुप्त व्यवस्था तैनात करण्यात आली होती. खरं तर, 31 वर्षीय चार्ली कर्कची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. युटा व्हॅली विद्यापीठात टर्निंग पॉइंट USA नावाच्या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान, कर्क हा बंदुकीच्या हिंसाचारावरील प्रश्नांची उत्तरे देत असताना अचानक त्याच्यावर गोी झाडण्यात आली, जी त्याच्या मानेवर गोळी लागली. काही सेकंदातच रक्त वाहू लागले आणि त्याचा मृत्यू झाला. ते पाहून सर्वत्र आरडाओरडा आणि गदारोळ सुरू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला.
कर्क यांना सर्वोच्च नागरी सन्मान
कर्क हे ट्रम्प यांचे जवळचे सहकारी होते. त्याच्या हत्येमुळे खुद्द राष्ट्राध्यक्षही हादरले आहेत. चार्ली कर्क याला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान, प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान केला जाईल असे ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले. तर उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स यांनी कर्कच्या कुटुंबाला वैयक्तिक भेट देत सांत्वन केलं. व्हाईट हाऊसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्पच्या आगामी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक नवीन सुरक्षा नियम लागू केले जाऊ शकतात.
कर्कची पत्नी उद्ध्वस्त
मृत चार्ली कर्कची पत्नी एरिका यांची प्रकृती खूपच नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. ‘माझे एरिकाशी बराच वेळ बोलणे झाले. ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या क्षणी तिच्या मानसिक स्थितीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही ‘ असं ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले. चार्ली कर्क यांची पत्नी एरिका स्वतः देखील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ती 2012 साली मिस ॲरिझोना यूएसए होती आणि तिने कॉलेज बास्केटबॉल देखील खेळले आहे. 2019 मध्ये तिची चार्लीशी ओळख झाली आणि दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. त्यांना दोन लहान मुले आहेत. पतीच्या निधनामुळे ती उद्ध्वस्त झाली आहे.