भारताला अमेरिकेचा मोठा दणका! थेट 24 भारतीय असलेल्या जहाजावर हल्ला, 2 जणांचा मृत्यू तर..
मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला आहे. त्यामध्येच होर्मुज खाडी इराणकडून पूर्णबंद करण्यात आली. ओमानच्या खाडीत आता अमेरिकेची दादागिरी वाढली आहे. थेट जहाजांवर मोठे हल्ले अमेरिकेकडून केली जात आहेत. आता भारतासाठी अत्यंत वाईट बातमी पुढे आली.

होर्मुज खाडीतून अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ओमान खाडीजवळ अमेरिकेने जहाजावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय खलाश्यांचा मृत्यू झाला. एकाचा शोध सुरू आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. होर्मुज खाडीजवळ इराणने अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर पाडले. त्यानंतर अमेरिकेने थेट इराणवर हल्ले केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आलेत. इराणकडून धमकी देण्यात आली की, जर कोणत्याही प्रकारच्या जहाजाने होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न केला तर सरळ उडवून टाकले जाईल. अमेरिकेनेही इराण जवळ नाकेबंदी केली. त्यामध्येच इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर अमेरिका हल्ले करत आहे. एका जहाजावर अमेरिकेने मोठा हल्ला केला. त्यात दोन भारतीयांचा मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे.
27 भारतीय लोक असलेल्या जहाजावरही अमेरिकेच्या लष्कराने हल्ला केला होता. त्यानंतर ओमानच्या लष्कराने या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा अमेरिकेने मोठा हल्ला केला. जहाजावरील चीफ इंजिनिअर देखील बेपत्ता आहे. सीमेंस यूनियन ऑफ इंडियानेही या घटनेची पुष्टी केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले. सेटेबेलो या जहाजावर 24 भारतीय नागरिक उपस्थित होते.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर 3 जण बेपत्ता झाले. त्यापैकी दोन जणांचे मृतदेह सापडली आहेत. अजून एकजण बेपत्ता आहे. खाडी देशात तणाव प्रचंड वाढला आहे. ज्यामुळे आता भारतीय खलाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आलंय. हिमाचल प्रदेश येथील रहिवाशी आदित्य शर्मा (वय 23), शिवानंद चाैरसिया यांचा मृत्यू झाला. सुरेश पनाला याचा शोध सुरू आहे.
सुरेश यांच्या सुरक्षेसाठी एजन्सीकडून काम केले जात असून त्यांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्र मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, फॉरवर्ड सीमेंस यूनियन ऑफ इंडिया यांच्या माहितीनुसार, ज्या जहाजाला अमेरिकेच्या लष्कराने टार्गेट केले त्याचे नाव एमटी सेटेबेलो आहे. त्या जहाजावर पलाऊचा झेंडा होता. या जहाजात 24 भारतीय नागरिक होते. ओमानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जहाजावरील 21 भारतीय नागरिकांना सुरक्षित काढण्यात यश आले. भारताने या घटनेचा निषेध केला.