2020 पेक्षा 2021 अधिक भयानक असेल, बाबा वेंगाची भविष्यवाणी

आपण कितीही ठरवलं तरी 2020 च्या कटू आठवणी विसरू शकणार नाही. त्यामुळे अनेक जण हे 2020 वर्ष कधी संपणार याची वाट पाहात आहेत.

2020 पेक्षा 2021 अधिक भयानक असेल, बाबा वेंगाची भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 4:11 PM

मुंबई : यंदाचं वर्ष जभरातील लोकांना फारसं चांगलं गेलेलं नाही. यंदा कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग व्हेंटिलेटरवर आहे. आपण कितीही ठरवलं तरी 2020 च्या कटू आठवणी विसरू शकणार नाही. त्यामुळे अनेकांनी 2020 हे सर्वात वाईट वर्ष होतं असं जाहीरच केलं आहे. त्यामुळे अनेक जण हे 2020 वर्ष कधी संपणार याची वाट पाहात आहेत. पुढील वर्ष अजून चांगलं असेल अशी लोकांची 2021 कडून अपेक्षा आहे. परंतु बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. (Bulgarian mystic Baba Vanga’s predictions for upcoming year 2021)

बाल्कानची नॉस्रेदमस अशी ओळख असलेल्या बाबा वेंगा यांनी 2021 बाबत केलेल्या भविष्यवाणी जर खऱ्या ठरल्या तर पुढील वर्ष हे 2020 पेक्षाही अधिक वाईट ठरेल. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचं 1996 मध्ये निधन झालं आहे. परंतु त्यापूर्वीच त्यांनी साल 5079 पर्यंतच्या भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत. बाबा वेंगा यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेवरील 9/11 चा हल्ला, ब्रेक्झिटसह जगभरातील अनेक घटनांबाबत बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी अचूक ठरल्याचा दावा केला जातो.

2021 बाबत बाबा वेंगा यांनी सांगितलं आहे की, जगात अनेक प्रलय आणि आपत्ती येतील. एक मोठा ड्रॅगन माणसावर ताबा मिळवेल. भविष्यवाणी आणि गूढ भाषांमधील तज्ज्ञांच्या मते बाबा वेंगाचा इशारा चीनच्या दिशेने होता. चीन अमेरिकेला नमवत जगातील सर्वात शक्तीशाली देश बनेल. भारतही अधिक बलवान होणार आहे. युरोपात रासायनिक हल्ले होतील. तसेच इंधनावरूनही भांडणं होतील. पेट्रोलियमचं उत्पादन थांबू शकतं.

बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन, अमेरिकेवरील 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेंस डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल दुर्घटना, अमेरिकेला मिळालेले पहिले आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष, यांसह अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. वेंगा यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांच्याबाबतही भविष्यवाणी केली होती. ट्रम्पना गूढ आजार होईल तर पुतीन यांच्यावर त्यांच्याच देशातील काही समाजकंटक हल्ला करतील, असंही सांगितलं होतं.

हेही वाचा

पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL

लेकीच्या लग्नात आईच झाली नवरी, आधी कन्यादान नंतर सात जन्माची गाठ!

आयआयटीत शिक्षण, तरीही भीक मागण्याची वेळ, मध्यप्रदेशच्या आजोबाची चटका लावणारी कहाणी

(2021 will be more terrible than 2020, Baba Venga predicts)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.