जग संकटात! अमेरिकेचा खळबळ उडवणारा निर्णय, तब्बल 23 पेक्षा अधिक देशांवर मोठा टॅरिफ, एक चूक..
इराणमध्ये सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिका आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत आहेत. इराणमध्ये इंटरनेटवर बंदी आहे. आता या आंदोलनाचा थेट भारताला फटका बसताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली नाही तर भारतावर 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेने दिली. अमेरिका आणि इराणमधील संबंध तणावात असून अमेरिकेचा इराणवर दबाव असून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला अमेरिका पाठिंबा देत आहे. हेच नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, इराणची जनता त्यांच्या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असून त्यांचा विजय जवळ आहे. मात्र, सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लोकांवर मोठी कारवाई केली जात आहे.
इराण सरकारने अगोदरच स्पष्ट केले की, आमच्या देशांच्या मुद्यामध्ये आम्ही इतर देशांचा हस्तक्षेप सहन करणार नाही. अनेक धमक्यांनंतरही इराण ऐकत नसल्याचे लक्षात येताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतला. फक्त धमकीच नाही तर हा माझा आदेश असून आतापासून टॅरिफ लागू झाल्याचेही त्यांनी म्हटले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. इराणसोबत जगातील जवळपास 23 देश अंदाजे व्यापार करतात. त्या सर्व देशांवर आता अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ लावला.
जगातील अनेक देश इराणसोबत व्यापार करतात, त्यापैकी भारत देखील एक आहे. त्यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागण्याची दाट शक्यता आहे. अगोदरच अमेरिेकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामध्ये जर भारतावर अमेरिका कारवाई करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच भारतावरील टॅरिफ आता 75 टक्के होण्याची शक्यता आहे.
भारताचा मोठा निर्यातदार इराण आहे. भारतातून अनेक गोष्टी इराणमध्ये जातात. जर अमेरिकेच्या भीतीने भारताने इराणमधील निर्यात थांबवली तर भारताला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, भारताच्या इराणला होणाऱ्या निर्यातीमध्ये सेंद्रिय रसायनांचा सर्वात मोठा वाटा आहे. 512.92 दशलक्ष डॉलर्स होते. फळे, सुकामेवा, खरबूज भारतातून मोठ्या प्रमाणात इराणमध्ये निर्यात होते. ज्यांचे मूल्य अंदाजे 311.60 दशलक्ष डॉलर्स होते.
