AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात घडतंय भयंकर, तब्बल 30 हून अधिक देश लंडनमध्ये बैठकीस दाखल, युद्धात थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी अनेक देश पुढे येत आहेत. गेल्या 48 तासात होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत तणाव असल्याने जग जैरीस आले. स्थिती व्यवस्थित होण्याऐवजी अधिक बिघडताना दिसत आहे.

जगात घडतंय भयंकर, तब्बल 30 हून अधिक देश लंडनमध्ये बैठकीस दाखल, युद्धात थेट..
Meeting in London
| Updated on: Apr 22, 2026 | 12:48 PM
Share

जगातील सर्वात मोठा सागरी मार्ग असलेल्या होर्मुजमध्ये तणाव प्रचंड आहे. होर्मुज खाडीतील स्थिती बिकड होत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबून होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही जगाची इच्छा आहे. मात्र, होर्मुज खाडीत सर्वकाही विपरीत घडत आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर गोळीबार केला जात आहे. अमेरिकेने होर्मुजमध्ये केलेल्या नाकेबंदीनंतर इराण आक्रमक झाला. परिस्थिती चिघळली आहे. अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीमुळे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. होर्मुजमधील घडामोडीत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. अनेक देशात ऊर्जेचे मोठे संकट आहे. आता हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत मोठा निर्णय जगातील काही देशांनी घेतला. तब्बल 30 हून अधिक देश होर्मुज खाडीसाठी एकत्र आले.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज खाडीतून होणारी जलवाहतूक पुन्हा सुरळीत करण्याकरिता 30 हून अधिक देश पुढे आलेत. बुधवारी आज लंडनमध्ये याबाबत महत्वाची बैठक पार पडणार आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीचा मुख्य उद्देश आहे की, होर्मुज खाडीतील परिस्थिती सामान्य होणे आणि पूर्वीसारखी सुरक्षित वाहतूक होणे.

या बैठकीला भारतालाही निमंत्रण मिळाले आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, पोलंड, ब्रिटन, बेल्जियम, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा यासारखे देश सहभागी होणार आहेत, यासोबतच अजून काही देशांची नावे पुढे येणे शिल्लक आहे. या बैठकीपासून अमेरिकेला दूर ठेवण्यात आले.

युद्धात सहभागी असलेल्या देशांच्या यात समावेश करण्यात आला नाही. होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी थेटपणे भूमिका घेताना काही देश दिसत आहेत. हा मोहिमेचे नेतृत्व ब्रिटन आणि फ्रान्स करत आहेत. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा नक्की कशी मिळेल, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेने होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी काही देशांची मदत मागितली. मात्र, एकगही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल