US Election 2024 : या 5 कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प हरलेली बाजी जिंकण्याच्या जवळ पोहोचले

America Election Results : काही तासात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच चित्र स्पष्ट होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये मतदानाचा हक्क बजावताना अटी-तटीचा सामना असल्याचा इन्कार केला व तेच जिंकणार असं म्हटलं. ट्रम्प खरोखरच ही निवडणूक जिंकले, तर हरलेली बाजी पलटण्यामागे ही 5 कारणं असतील.

US Election 2024 : या 5 कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प हरलेली बाजी जिंकण्याच्या जवळ पोहोचले
donald trump-kamala harris
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 9:24 AM

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. आता मतमोजणी सुरु आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यामध्ये सामना आहे. हा सामना अटी-तटीचा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतल्यात दिसत आहे. मागच्या काही दिवसात हवेची दिशा बदलल्याच स्पष्टपणे जाणवत होतं. मतदानाच्या काही आठवडे आधी अचानक ट्रम्प यांच्यासाठी समर्थन वाढलं होतं. यामागे अनेक कारणं होती. मागच्या 6 महिन्यात अमेरिकन निवडणुकीत अनेक चढ-उतार पहायला मिळाले आहेत. यात ज्यो बायडेन यांनी व्हाइट हाऊसच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कमला हॅरिस यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

आधी डोनाल्ड ट्रम्प पुढे दिसत होते. पण कमला हॅरिस शर्यतीत उतरताच चित्र पालटलं. अनेक सर्वेक्षणांमध्ये कमला पुढे दिसू लागल्या. पण हे फार काळ टिकलं नाही. या दरम्यान निवडणूक प्रचारात ट्रम्प यांच्या हत्येचा सुद्धा प्रयत्न झाला. यामुळे ट्रम्प यांचे समर्थकच एकवटले नाहीत, तर जनतेची भूमिका सुद्धा बदलली. ट्रम्प एक मजबूत नेते असल्याचा त्यांच्या समर्थकांनी प्रचार केला.

पहिलं कारणं

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण लावून धरलं. अमेरिकेत बेकायद राहणाऱ्यांचा त्यांनी विरोध केला. परदेशी लोक अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत असा 2016 मध्ये प्रचार केला. आपल्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायद घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यास सुरुवात केली. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अमेरिकेत बेकायद राहणाऱ्यांचा मुद्दा उचलून धरला.

दुसरं कारण

विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुढच्याच वर्षी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. अजूनही हे युद्ध सुरु आहे. मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जो विनाश सुरु केला तो लेबनानपर्यंत पोहोचला. गाजा आणि लेबनानमध्ये मिळून जवळपास 46 हजार मृत्यू झाले. वेगवेगळ्या आघाड्यांवर सुरु असलेलं हे युद्ध रोखण्यात बायडेन प्रशासन अपयशी ठरलं. बायडेन प्रशासन हे रोखण्यात असमर्थ ठरल्याचा संदेश गेला. त्यामुळे अमेरिकेतील एक मोठा वर्ग आणि मुस्लिम देश नाराज आहेत. अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी सैन्य आणि आर्थिक मदत अवैध असल्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलं आहे. ही मदत रोखणार असल्याच ट्रम्प यांनी जाहीर केलय. अरब-अमेरिकी मतदारांना लेबनान संघर्ष थांबवण्याच सुद्धा आश्वासन दिलं आहे.

तिसरं कारणं

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी भक्कपणे उभे राहिले. मस्क मागच्या 6 महिन्यापासून ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. हाय स्टेक पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्या विजयासाठी बराच वेळ आणि ऊर्जा खर्च केली. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना पुन्हा आणलं. महत्त्वाच म्हणजे X ला त्यांनी ट्रम्प यांच्या प्रचार मशीनमध्ये बदललं. रोज ट्रम्प यांच्या समर्थनार्थ त्यांनी हजारो पोस्ट केल्या.

चौथं कारणं

ट्रम्प यांच्या समर्थकांना ‘MAGA समर्थक’ म्हटलं जातं. म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. या समर्थकांनी सोशल मीडियावर कमला हॅरिस यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना एक कमकुवत दावेदार ठरवलं. मीडियावर ते डेमोक्रॅटिक पार्टीच समर्थन करत असल्याचा आरोप केला. ट्रम्प यांची प्रभावी प्रचार यंत्रणा सुद्धा महत्त्वाची ठरली.

पाचवं कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चार गुन्हेगारी खटले सुरु आहेत. ही निवडणूक त्यांच्या व्यक्तीगत आणि राजकीय जीवनात निर्णायक ठरु शकते. विजयामुळे कायदेशीर लढाई कमीत कमी चार वर्षांसाठी टळेल किंवा खटले रद्द होतील. पण ट्रम्प निवडणूक हरले, तर शिक्षा आणि खटले सुरु होतील. त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या केसेसमध्ये निर्णय न येणं ही सध्या सकारात्मक बाब आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.