जग हादरलं! 7 देश थेट लावणार भारतावर टॅरिफ, मोठं संकट, अर्थव्यवस्थेला धक्का, डोनाल्ड ट्रम्प..

India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर ते सतत धमक्या देताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या मुद्द्यामध्ये इतरही सात देशांना भारताच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.

जग हादरलं! 7 देश थेट लावणार भारतावर टॅरिफ, मोठं संकट, अर्थव्यवस्थेला धक्का, डोनाल्ड ट्रम्प..
Tariff
| Updated on: Oct 02, 2025 | 8:20 AM

मागील काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर दोन हात करताना दिसतंय. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. यासोबतच व्यापारासाठी भारताला महत्वाचे असलेल्या बंदरचा करारही रद्द केला. H-1B व्हिसाच्या नियमात बदलही केला. मात्र, यानंतरही भारतावर दबाव टाकण्याचे काम अमेरिकेचे सध्या सुरू आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका दबाव टाकत आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 7 देश भारताच्या विरोधात मोठा कट रचत आहेत. त्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादा असेल जी-7 देशांना म्हटले. आता भारताविरोधात थेट कारवाईचे संकेत आहेत.

जी-7 देश कारवाईच्या तयारीत असून बुधवारी जी-7 देशांनी दबाव वाढवण्यासाठी ठोस कारवाईचे संकेत दिली आहेत. टॅरिफ, निर्बंध, आयात-निर्यात बंद यावर बैठकीत चर्चा झाली. जी-7 ने आपल्या निवेदनात म्हटले की, आम्ही आता त्यांना टार्गेट करणार आहोत जे युक्रेनवरील अतिक्रमणात देखील रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. जी-7 मध्ये कॅनडा, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, जपान, इटली आणि ब्रिटेन हे देश आहेत.

कॅनडा हा देखील यंदा जी-7 चा अध्यक्ष आहे. आता हे देश मिळून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठे निर्बंध लादू शकतात. यामुळे भारताच्या समस्यांमध्ये अधिकच वाढ होऊ शकते. भारतावर अमेरिकेने अगोदरच मोठे टॅरिफ लादलेले असतानाही अमेरिकेच्या अटी भारत मानत नसल्याने वेगवेगळ्या पद्धतीने भारताला अडकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करत आहेत. आता जी-7 देशांना त्यांनी आपले शस्त्र बनवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावानंतर जी-7  देश भारतावर नेमकी काय कारवाई करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, यामुळे भारतासह चीनचे टेन्शन वाढले आहे. अगोदरच अमेरिकेने भारतावर इतका मोठा टॅरिफ लावला, त्यामध्येही आता इतरही सात देशांना भारताच्या विरोधात अमेरिका मैदानात उतरवताना दिसत आहे. यामुळे एकच गोंधळ उडालाय.