AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी! 50 रुम्सचा महल, कोट्यवधींची होणार राणी… पण ती अट कोणती?

Sir Benjamin: सर बेंजामिन स्लेड हे ब्रिटेनमधील सुखवस्तू, अतिश्रीमंत व्यक्तिमत्व, वयाच्या 79 व्या वर्षी त्यांना एका सुंदर, तरुण साथीदाराची गरज आहे. पण त्यासाठी अर्थातच एक मोठी अट आहे. या जवळपास 80 वर्षाच्या तरुणाची ही इच्छा समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी! 50 रुम्सचा महल, कोट्यवधींची होणार राणी... पण ती अट कोणती?
79 वर्षांच्या नवरोबाला हवीये तरुण पत्नी!Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 09, 2026 | 3:47 PM
Share

Sir Benjamin: सध्या सोशल मीडियावर ब्रिटेनमधील एका वयोवृद्ध अब्जाधीशाची जोरदार चर्चा आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांना एक सुंदर, तरुण साथीदार हवा आहे. त्यांच्याकडे काय नाही? जगातील सर्व संपत्ती पायाशी लोळण घेत आहे. पैसा, संपत्ती, मोठा महल, अनेक व्यवसाय, आलिशान जीवन सर्व काही त्यांच्याकडे आहे. पण साथीदार नाही. लग्नासाठी त्यांनी एक खास अट ठेवली आहे. त्याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. या वयात अनेकांचे हातपाय थरथरतात. मनाने आणि शरीराने अनेक जण थकतात. पण सर बेंजामिन स्लेड हे त्याला अपवाद आहेत. त्यांचं मन अजूनही तरूण आहे.

कोण आहेत सर बेंजामिन स्लेड?

सर बेंजामिन स्लेड हे ब्रिटेनमधील एक मोठे प्रस्थ आहेत. ते सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले. ते व्यावसायिक, उद्योगपती आहेत. सोमरसेट इथे त्यांचा अत्यंत जूना आणि भव्य असा मोनसेल हाऊस (Maunsel House) डौलात, दिमाखात उभा आहे. या भव्य महलात 50 भव्य खोल्या आहेत. मोठं मोठे बाग-बगिचे. समृद्धी, ऐश्वर्य हात जोडून उभे आहेत. पण आता त्यांना या वयात एक चिंता सतत सतावत आहे. या वयात त्यांचा या विशाल साम्राज्याला वारस हवा आहे. त्यांना वाटते की त्यांची होणारी बायको त्यांचा वारसदार देईल. त्यांनी ही सर्व सुखं पत्नीच्या पायाशी असतील असे अभिवचन दिले आहे.

पत्नीला काय काय मिळेल?

ब्रिटेनच्या या अब्जाधीशाने पत्नीला काय काय ऑफर्स दिल्या त्याची यादीच वाचून दाखवली आहे. पत्नी या आलिशान महलाची राणी होईल. खर्चासाठी दरवर्षी मोजता येणार नाही इतका पैसा मिळेल. जगातील सर्वात महागड्या कार दिमतीला असतील. आलिशान आयुष्य ती जगेल. या सर्व संपत्तीवर तिचा समान हक्क असेल.

View this post on Instagram

A post shared by Nugget (@nugget)

तरुण पत्नीसाठी शोधाशोध

सर बेंजामिन यांनी तरुण पत्नीसाठी मोठा शोधाशोध सुरू केली आहे. अनेक डेटिंग साईट्सवर त्यांनी प्रोफाईल अपडेट केली आहे. स्थानिक वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती दिल्या आहेत. टीव्हीवरही त्यांनी आपली इच्छा जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अकाऊंटवरून तरुण पत्नीसाठी जाहीर आवाहन केले आहे. अर्थात त्यांना अनेक तरुण मुलींकडून लग्नासाठीचे प्रस्ताव आले आहेत. पण त्यांची एक मोठी अट आहे. त्यांच्या मते, केवल आलिशान जीवनाच्या आमिषाने आलेल्या तरुणीशी ते लग्न करणार नाहीत. ते तर तिला मिळणारच आहे. पण जी त्यांच्या उर्वरीत आयुष्यात त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने नाते निभावणारी असेल तिच्यासोबतच ते लग्न करणार आहेत.

Follow Us
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण