Kabul Airport, Taliban Crisis काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झालीय. विशेषतः अफगाणमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणात असलेल्या काबुल विमानतळाचा उपयोग होत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणाऱ्यांची तिथं प्रचंड गर्दी होतेय. त्यात तालिबान्यांकडून या परिसरातही नागरिकांवर अत्याचार सुरू आहे. याच सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून काबुल विमानतळावर सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अशक्य झालंय. या ठिकाणी एक बॉटल पाण्यासाठी 3,000 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक ताट जेवणासाठी तब्बल 7,500 रुपये द्यावे लागत आहेत. या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्यानंच अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय.