VIDEO : अखेर ज्याची भीती होती ते घडलं, काबूल विमानळावर दोन बॉम्बस्फोट, आयसीसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 26, 2021 | 9:01 PM

अफगाणिस्तान देश दोन बॉम्बस्फोटच्या घटनांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले आहेत.

VIDEO : अखेर ज्याची भीती होती ते घडलं, काबूल विमानळावर दोन बॉम्बस्फोट, आयसीसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

काबूल : अफगाणिस्तान देश दोन बॉम्बस्फोटच्या घटनांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.

परिसरात प्रचंड खळबळ

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. पण सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

अफगाणिस्तान देश 15 ऑगस्टपासून तालिबानने ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांचं रेसक्यू मिशन सुरु आहे. आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सुखरुप अफगाणिस्तानातून आपल्या मायदेशी घरी नेलं आहे. पण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे गर्दिमुळे चेंगराचेंगरीच्या घटना समोर येत होत्या. त्यानंतर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट बॉम्बस्फोटची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून बॉम्बस्फोटच्या घटनेला दुजोरा

विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. “काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला आहे. आतापर्यंत जखमी आणि मृतकांची संख्या समोर आलेली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जारी केली जाईल”, असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं आहे.

घटनेचा थरार बघा :

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा : मोठी बातमी ! काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI