मोठी बातमी ! काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी ! काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट


काबूल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamid Karzai International Airport) दहशतवादी हल्ल्याचा धोका वर्तवण्यात आला होता. हाच धोका दुर्देवाने खरा ठरला आहे. या दुर्घटनेत अनेक नागरीक जखमी झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. “काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला आहे. आतापर्यंत जखमी आणि मृतकांची संख्या समोर आलेली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जारी केली जाईल”, असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आता आयसीस या दहशतवादी संघटनेने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

परिसरात प्रचंड खळबळ

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. पण सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

अफगाणिस्तान देश 15 ऑगस्टपासून तालिबानने ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांचं रेसक्यू मिशन सुरु आहे. आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सुखरुप अफगाणिस्तानातून आपल्या मायदेशी घरी नेलं आहे. पण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे गर्दिमुळे चेंगराचेंगरीच्या घटना समोर येत होत्या. त्यानंतर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट बॉम्बस्फोटची माहिती समोर आली आहे.

‘काबूल विमानतळ अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं’

आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून आम्ही या हल्ल्याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात असू शकतो याबाबत माहिती दिली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ काही दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर होतं. यापूर्वी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करणार, असं सांगितलेलं होतं. त्यानंतर इंग्लंडच्या गुप्तहेर सूत्रांनी याबाबत कालच माहिती दिली होती. काबूल विमानतळावर कधीही हल्ला होऊ शकतो, असं इंग्लंडच्या गुप्तहेर सूत्रांनी सांगितलं होतं, अशी माहिती शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

‘फ्रान्सचं विमान हायजॅक’

काही दिवसांपूर्वी फ्रान्सचं एक विमान त्यांच्या नागरिकांना घेऊन टेकऑफ करत होते. त्यावेळी विमानातून फ्लायर सोडण्यात आले होते. हे अॅटोमॅटिक फ्लायर हे ज्यावेळी विमानावर हल्ला होतो त्यावेळी सोडले जातात. त्यामुळे फ्रान्सच्या फ्लाईटरही हल्ला होण्याची शक्यता होती. यापूर्वी अनेक संकेत मिळाले होते. त्यामुळे आता अफगाणिस्तानात फक्त तालिबानचं राज्य नाही. कारण अशाप्रकारचा हल्ला केवळ तालिबानकडून होणं अशक्य आहे, असंही शैलेंद्र देवळाणकर म्हणाले.

अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी संघटनेचे प्रतिनिधी

विशेष म्हणजे तालिबानला आता पूर्ण आंतरराष्ट्रीय मान्यतेची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे हल्ला होण्याची शक्यता कमी आबे. अशा प्रकारचे हल्ले हे आयसीस, अलकायदा, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद करु शकतात. या सर्व संघटनांचे सदस्य सध्या अफगाणिस्तानात आहे. या संघटनांमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची स्पर्धा आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, अशी माहिती देवळाणकर यांनी दिली.

अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटनंतरच्या मदतकार्याचा व्हिडीओ

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

VIDEO : जगण्याचा आशावाद, आजूबाजूला मृत्यूचं तांडव, पण त्यातही या चिमुरड्यांचं प्रेम प्रत्येकाचं मन जिंकतंय

पंजशीर खोऱ्यातील युद्धाच्या आव्हानाला तालिबान घाबरला; म्हणाला…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI