पंजशीर खोऱ्यातील युद्धाच्या आव्हानाला तालिबान घाबरला; म्हणाला…

हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. आम्ही ताकदीने किंवा चर्चेद्वारे पंजशीरची समस्या सोडवू, असं तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम म्हणालेत.

पंजशीर खोऱ्यातील युद्धाच्या आव्हानाला तालिबान घाबरला; म्हणाला...

नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे. हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. आम्ही ताकदीने किंवा चर्चेद्वारे पंजशीरची समस्या सोडवू, असं तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम म्हणालेत.

तर तालिबानला योग्य उत्तर मिळणार

काबूलच्या उत्तरेस स्थित पंजशीर घाटी ही तालिबानविरोधी शक्तींचा प्रमुख गड आहे. संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तालिबानने तेथे आक्रमण केले आणि जबरदस्तीने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथले जमलेले सशस्त्र गट योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात.

पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र

हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. अफगाण नेता अहमद शाह मसूदने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि तालिबानशी युद्धादरम्यान 2001 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत पंजशीर खोऱ्याचे संरक्षण केले. यामुळेच येथील लोकांनी पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतलीत.

अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद यांच्याकडून तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केलीय. देशाच्या घटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केलेय. त्यांनी पंजशीर खोऱ्यातून तालिबानविरुद्ध युद्ध जाहीर केलेय. दुसरीकडे अहमद शाहचा मुलगा अहमद मसूदने म्हटले आहे की, तो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहे. मुजाहिद्दीन सेनानींनी पुन्हा एकदा तालिबानशी युद्धासाठी तयार राहावे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी एका फ्रेंच मासिकाच्या लेखात ‘तालिबानविरुद्ध युद्ध’ जाहीर केले.

तालिबान्यांनी काबूलचा ताबा घेतल्यानंतर अराजकतेचे वातावरण

विशेष म्हणजे रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल काबीज केली आणि युद्ध संपल्याची घोषणा केली. त्याच वेळी काबूलला पोहोचण्याआधीच देशाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून यूएईमध्ये पळून गेले. काबूलचा तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर अराजकतेचे वातावरण होते. तालिबानने ग्राऊंड बॉर्डर क्रॉसिंग ताब्यात घेतल्यानंतर काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक दाखल झाले. जेणेकरून ते युद्धग्रस्त देशापासून विमानांद्वारे पळून जाऊ शकतील. मात्र, या काळात चेंगराचेंगरी आणि गोळीबारामुळे अनेक लोकांचा बळी गेला.

संबंधित बातम्या

Indian in Afghanistan : अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात

काबूल विमानतळावरुन 150 पेक्षा जास्त प्रवाशांचं तालिबानकडून अपहरण, अनेक भारतीयांचा समावेश

The Taliban feared the challenge of war in the Panjshir Valley; Said …

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI