अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग, कुणाला मोठ्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार?

| Updated on: Sep 02, 2021 | 7:26 AM

अफगाण सैन्याची माघार आणि अमेरिकेच्या सैन्याची घरवापसी झाल्यानंतर आता तालिबानचा अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्ण मोकळा आहे. त्यामुळे तालिबानकडून कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा होऊ शकतो.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग, कुणाला मोठ्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार?
Follow us on

Taliban Government Cabinet काबुल : अफगाण सैन्याची माघार आणि अमेरिकेच्या सैन्याची घरवापसी झाल्यानंतर आता तालिबानचा अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्ण मोकळा आहे. त्यामुळे तालिबानकडून कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा होऊ शकतो. तालिबान आणि अन्य अफगाण नेता संघटनेच्या (तालिबान) वरिष्ठ धार्मिक नेते नवं सरकार आणि मंत्रिमंडळ स्थापनेच्या निर्णयावर आलेत. त्यामुळे याची केव्हाही घोषणा होऊ शकते. तालिबान संघटनेचा सुप्रीम कमांडर हिबतुल्लाह अखुंदजादा (Haibatullah Akhundzada) कोणत्याही परिषदेचा सर्वोच्च नेता असणार आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य बिलाल करीमीने याबाबत माहिती दिलीय.

मंत्रिमंडळात मोठ्या मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार

अब्दुल गनी बरादर

अब्दुल गनी बरादर (Abdul Ghani Baradar) तालिबानचा डेप्युटी लीडर आणि संघटनेचा मुख्य सार्वजनिक चेहरा आहे. बरादर अफगाणचा पुढील राष्ट्रपती होण्याचीही शक्यता आहे. त्याचे ओसामा बिन लादेनशी संबंध होते. त्याने मुल्ला मोहम्मद उमरसोबत तालिबानची स्थापना केली होती.

सिराजुद्दीन हक्कानी

हक्कानी नेटवर्क आणि तालिबान 2016 मध्ये सोबत आले. यासह सिराजुद्दीन हक्कानी (Sirajuddin Haqqani) तालिबानचा दुसरा डिप्टी लीडर बनला.

मोहम्मद याकूब

तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मोहम्मद याकूब (Mohammad Yaqoob) आहे. त्याला तालिबानचं सर्वोच्च पद दिलं जाण्याचीही चर्चा होती. मात्र आता त्याच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध होतेय. तो सध्या सिराजुद्दीन हक्कानीसोबत सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम करत असल्याचं बोललं जातंय.

अब्दुल हकीम हक्कानी

अब्दुल हकीम हक्कानी (Abdul Hakim Haqqani) सुप्रीम कमांडर हैबतुल्लाह अखुंदजादाचा खूप जवळचा सहकारी असल्याचं मानलं जातं. हक्कानी तालिबानच्या चर्चा करणाऱ्या टीमचं नेतृत्व करत होता. त्यानेच मागील अमेरिका सरकारसोबत शांतता राखण्यासाठी चर्चा केली होती. तो धार्मिक नेत्यांच्या एका वरिष्ठ परिषदेचा प्रमुख आहे.

शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई

शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई (Sher Mohammad Abbas Stanikzai) तालिबानचा प्रमुख राजकीय नेता आहे. तो फडाफड इंग्रजी बोलतो. अफगाणिस्तानवर याआधी तालिबानची सत्ता होती तेव्हा तो डेप्युटी परराष्ट्र मंत्री होता. त्याने चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचंही नेतृत्व केलं होतं.

जबीउल्लाह मुजाहिद

जबीउल्लाह मुजाहिदने (Zabihullah Mujahed) या आठवड्यात काबुलमध्ये तालिबानची पहिली पत्रकार परिषद घेतली. मुजाहिदचे संदेश आंतरराष्ट्रीय समुहापर्यंत पोहचवण्याची महत्त्वाची भूमिका त्याच्याकडे आहे. 20 वर्षांमधील युद्धाच्या काळात त्याने पत्रकारांशी केवळ फोन आणि मेसेजवर चर्चा केलीय.

हेही वाचा :

अमेरिकेने अफगाणच नाही तर तालिबान्यांसाठी मागे ‘ही’ धोकादायक शस्त्रास्त्रं आणि युद्ध विमानं मागे सोडलीय

संपूर्ण अफगाणवर तालिबान्यांचं राज्य, मात्र पंजशीर प्रांतावर नाही, कारण काय?

अफगाणमधील पंजशीरमध्ये 350 तालिबान्यांचा खात्मा, 40 जण पकडले, स्थानिक नागरिकांच्या सैन्याचा दावा

व्हिडीओ पाहा :

Know who will be the next Ministers in Taliban Cabinet in Afghanistan