काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात. याआधीही सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या, मात्र तो निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता बुधवारी (8 सप्टेंबर) नव्या तालिबान सरकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, हे नवं सरकार तालिबानचा नेता मुल्ला बरादरच्या नेतृत्वात नव्हे तर मुल्ला हसन अखुंदच्या नेतृत्वाखाली स्थापन होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. हे नाव समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण आतापर्यंत अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वातच स्थापन होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.