
Nepal Violence : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहेत. बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळच्या या आंदोलनाला जेन झी आंदोलन म्हटले जात आहे. तरुणांचा संतापामुळे या देशात थेट सत्तापालट झाले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना थेट राजीनामा द्यावा लागलाय. विशेष म्हणजे राष्ट्रपतींनीही राजीनामा देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. दरम्यान, आता नेपाळमधील या उठावामुळे भारताच्या शेजारी असलेल्या काही देशांतील अराजकांची चर्चा होत आहे. गेल्या चार वर्षांत भारताच्या शेजारी असलेल्या चार देशांमध्ये सत्तापालट झाले आहे. हे देश कोणते आहेत? इथे सत्ता का उलथवून लावण्यात आली होती? हे जाणून घेऊ या… नेपाळमध्ये नेमकं काय घडलं? नेपाळमधील केपी ओली शर्मा यांच्या सरकारने अलिकडेच सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यासारखे जवळपास सर्वच सोशल मीडिया प्लॅटपॉर्म बंद करण्यात आले होते. गेल्या...