Donald Trump Tariff : मला खुश करा, नाहीतर… वेनेजुएलावरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी
Donald Trump Tariff : अमेरिकेने शुक्रवारी मध्यरात्री दक्षिण अमेरिकी देश वेनेजुएलावर स्ट्राइक केला. अमेरिकेन फोर्सेसनी थेट वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताला धमकी दिली आहे. मला खुश करा असचं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफवरुन बोंबाबोंब सुरु केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. नवी दिल्लीने रशियन तेलाच्या मुद्यावर सहकार्य केलं नाही, तर भारतीय सामानाच्या आयातीवर सध्या असलेला टॅरिफ पुन्हा वाढवेन अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. सध्या अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय सामनावर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध सुरु ठेवण्यासाठी आर्थिक बळ मिळतं असा ट्रम्प यांचा दावा आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यापासून ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय साहित्यावर 50 टक्के टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारताला आर्थिक आघाडीवर धक्का बसलाच. पण भारतीय व्यावसायिकांनी आपल्यासाठी अन्य बाजारपेठा शोधून काढल्या. त्यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षे इतका मोठा फटका बसला नाही.
“डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहितीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष खुश नाहीयत. मला खुश करणं गरजेच आहे. त्यांनी व्यापार सुरु ठेवला, तर आम्ही लगेच टॅरिफ वाढवू” व्हाइट हाऊसने शेअर केलेल्या ऑडिओमध्ये ट्रम्प असं बोलताना ऐकू येत आहे. अमेरिकेने शुक्रवारी रात्री वेनेझुएलावर हल्ला चढवून त्यांचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं. अमेरिकेने शेजारच्या दक्षिण अमेरिकेत असलेल्या वेनेझुएलावर हल्ला करण्यामागे तेल हे एकमेव कारण आहे.
दबाव टाकण्याच्या रणनितीचा भाग
भारत-अमेरिकासंबंध ताणले जाण्यामागे तेल हेच कारण आहे. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. ट्रम्प यांची ताजी धमकी ही दबाव टाकण्याच्या रणनितीचा भाग असू शकते. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताची रशियाकडून तेल आयात आणि मूल्य दोन्ही बाबतीत सहामहिन्याच्या उच्चतम पातळीला पोहोचली आहे. भारताची रशियाकडून होणारी तेल खरेदी 35 टक्क्यापर्यंत वाढली आहे. भारताची भूमिका तटस्थतेची आहे. त्यामुळे भारत फक्त रशियाकडून तेल खरेदी करतो असं नाहीय, तर अमेरिकेकडून सुद्धा भारताने तेल खरेदी वाढवली आहे.
#WATCH | On India’s Russian oil imports, US President Donald J Trump says, “… They wanted to make me happy, basically… PM Modi’s a very good man. He’s a good guy. He knew I was not happy. It was important to make me happy. They do trade, and we can raise tariffs on them very… pic.twitter.com/ANNdO36CZI
— ANI (@ANI) January 5, 2026
7.7 मिलियन टन तेल आयात
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नवीन आकड्यांनुसार भारताने नोव्हेंबर 2025 मध्ये रशियाकडून 7.7 मिलियन टन तेल आयात केलं. नोव्हेंबरमधील देशाने केलेल्या एकूण तेल आयातीमध्ये एकट्या रशियाचा वाटा 35.1 टक्के होता. नोव्हेंबर 2024 मधील आयातीपेक्षा हे प्रमाण 7 टक्क्याने जास्त आहे. मे 2025 नंतर नोव्हेंबर मध्ये भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केलं.
