Iran : इस्रायलनंतर इराणचा आणखी एका देशासोबत पंगा, Air Strike नंतर दोन दिवसात उचललं नको ते पाऊल

Iran : इस्रायलसोबत वाद सुरु असतानाच इराणने आणखी एका देशाची नाराजी ओढवून घेतली आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दोन दिवसात इराणने हे पाऊल उचललं. या देशाने इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात धमकी दिली आहे.

Iran :  इस्रायलनंतर इराणचा आणखी एका देशासोबत पंगा, Air Strike नंतर दोन दिवसात उचललं नको ते पाऊल
iran executes us resident german citizen sharmahd
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 12:37 PM

इराणने इस्रायलनंतर आणखी एका देशासोबत पंगा घेतला आहे. त्यांनी जमशेद शर्महदला फासावर लटकवलं. ही व्यक्ती मूळची जर्मन नागरिक आहे. इराणच्या या कृतीवर जर्मनीने संताप व्यक्त केला आहे. जर्मन नागरिकाला फासावर लटकवण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री अन्नालेना बैरबॉक यांनी दिली आहे. जमशेद शर्महद 68 वर्षीय सॉफ्टवेयर डेवलपर होते. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जमशेद शर्महद यांना इस्रायलच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी फाशी देण्यात आली.

जमशेद शर्महद जर्मन नागरिक होते. ते अमेरिकेत वास्तव्याला होते. 2020 मध्ये UAE यात्रेदरम्यान इराणच्या एजंट्सनी त्यांचं अपहरण केलं व त्यांना जबरदस्तीने इराणला घेऊन आले. फेब्रुवारी 2023 मध्ये इराणच्या न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप करत त्यांना मृत्यूची शिक्षा सुनावली. शर्महद यांना टोंडर नामक एक राजशाही समर्थक समूहाच नेतृत्व केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. 2008 साली शिराज येथील एक धार्मिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यामागे हाच समर्थक गट होता, असा इराणचा दावा आहे. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झालेला. 215 पेक्षा जास्त जखमी झालेले.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दोन दिवसात उचललं पाऊल

शर्महद यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप वारंवार फेटाळले. साक्षीच्या आधारावरही हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. ते अमेरिकेचे ग्रीन कार्ड धारक होते. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ही फाशी देण्यात आली. आमच्यावर हल्ल्यासाठी इस्रायलला इराकच हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली असा आरोप इराणने अमेरिकेवर केला आहे.

इराणला काय इशारा दिला?

आपल्या नागरिकाला इराणमध्ये फाशी झाल्यानंतर जर्मनीने कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे. ही फाशी नव्हे, हत्या असल्याने जर्मनीने म्हटलय. “इराणी शासनाने जमशेद शर्महदची हत्या केली. त्याचा मी कठोर शब्दात निषेध करते. एका जर्मन नागरिकांना फासावर देण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे आम्ही तेहरानला स्पष्ट केलय” असं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बैरबॉक यांनी X वर म्हटलय. इराणमधील अमेरिकी दूत अब्राम पेली यांनी या फाशीला घृणास्पद कृत्य ठरवलं आहे.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.