पीएम मोदी मलेशियाला जाणार नाही हे स्पष्ट होताच देशात राजकारणाला सुरुवात, काँग्रेसने म्हटलं…
पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटला उपस्थित राहतील, तिथे त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भेट होईल. ट्रेड टॅरिफ दरम्यान या भेटीची खूप चर्चा होती. पण पीएम मोदींच्या वर्चुअल संबोधनाची बातमी आल्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान परिषदेत सहभागी होणार नाहीत. ते मलेशियाला जाणार नाहीत. खुद्द मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या संबंधी टि्वट करुन माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी पोस्ट करुन त्यांनी लिहिलं की, नरेंद्र मोदी आसियान समिटला वर्चुअली संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका सहकाऱ्यासोबत चर्चा झाली, त्यात मलेशिया-भारत संबंध मजबूत बनवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. अनवर इब्राहिम यांनी टि्वट केलं की, “माझी पीएम मोदींच्या एका जवळच्या सहकाऱ्यासोबत चर्चा झाली. व्यवसाय आणि गुंतवणूकीत भारत आणि मलेशियाचं परस्परांना भक्कम सहकार्य राहीलं” असं अशी माहिती त्यांनी टि्वटमधून दिली आहे.
त्याशिवाय तंत्रज्ञान, शिक्षण आणि सुरक्षा विषयावर सुद्धा परस्परांना सहकार्य करु. अनवर म्हणाले की, “भारतात दिवाळीचा उत्सव सुरु आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्चुअली ASEAN समिटच्या आयोजनाला संबोधित करतील. आम्ही क्षेत्रात शांतता आणि समृद्धीसाठी भारतासोबत आहोत” आधी असा अंदाज होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटला उपस्थित राहतील, तिथे त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भेट होईल. ट्रेड टॅरिफ दरम्यान या भेटीची खूप चर्चा होती. पण पीएम मोदींच्या वर्चुअल संबोधनाची बातमी आल्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
पिछले कई दिनों से अटकलें चल रही थीं कि प्रधानमंत्री मोदी कुआलालंपुर सम्मेलन में जाएंगे या नहीं? अब यह लगभग तय हो गया है कि प्रधानमंत्री वहाँ नहीं जाएंगे।
इसका मतलब है कि कई विश्व नेताओं से गले मिलने, फ़ोटो खिंचवाने और ख़ुद को विश्वगुरु बताने के कई मौक़े हाथ से निकल गए।
पीएम… pic.twitter.com/LK3uB8SjWF
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 23, 2025
‘स्वत:ला विश्वगुरु दाखवण्याची संधी हातातून निघून गेली’
पंतप्रधान मोदींच्या मलेशियाला न जाण्याच्या निर्णयावर लगेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपरोधिक भाष्य केलं. “मागच्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुआलालंपुर येथे सम्मेलनासाठी जाणार की नाही या विषयी चर्चा सुरु होत्या. आता हे स्पष्ट झालय की, पंतप्रधान मोदी तिथे जाणार नाहीत. याचा अर्थ जागतिक नेत्यांची गळाभेट, फोटो काढणं आणि स्वत:ला विश्वगुरु दाखवण्याची संधी हातातून निघून गेली” पीएम मोदींना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर यायचं नाहीय, म्हणून ते मलेशियाला जाणं टाळत आहेत असा मोठा दावा जयराम रमेश यांनी केला. काही आठवड्यांपूर्वी इजिप्तमध्ये गाजा शांतता शिखर सम्मेलनात सहभागी होण्याचं निमंत्रण यामुळेच त्यांनी धुडकावलं असा दावा काँग्रेस नेत्याने केला.
