AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियानंतर आता आणखी एक देश भारताच्या समर्थनात आला पुढे, त्या देशाचे राष्ट्रपती बोलले, ‘मी ट्रम्पशी नाही, मोदींशी बोलणार’

दोन्ही देशांमध्ये व्यापार 12 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये दोन्ही देशातील व्यापार 12.20 अब्ज डॉलर म्हणजे एक लाख कोटीपेक्षा जास्त झाला आहे. रशियानंतर आज हा देश अमेरिकेसमोर भारताची ढाल बनून उभा राहिला आहे.

रशियानंतर आता आणखी एक देश भारताच्या समर्थनात आला पुढे, त्या देशाचे राष्ट्रपती बोलले, 'मी ट्रम्पशी नाही, मोदींशी बोलणार'
India
| Updated on: Aug 06, 2025 | 3:11 PM
Share

भारतावर टॅरिफ लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा सर्वप्रथम रशियाने विरोध केला. आता असा एक देश भारताच्या समर्थनात पुढे आला आहे, ज्याची कोणी अपेक्षा केली नव्हती. हा देश अमेरिकेसमोर भारतासाठी ढाल बनून उभा राहिला आहे. या देशाच्या राष्ट्रपतींनी सांगितलय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नाही, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणार. हे वक्तव्य अनेक गोष्टींकडे इशारा करतय. भारताच्या समर्थनात उभा राहिलेला हा देश आहे, ब्राझील. आधीच ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीचा ब्राझीलला मोठा फटका बसला आहे. म्हणून हा देश ट्रम्प यांच्यावर नाराज आहे.

ब्राझील ब्रिक्स परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे सुद्धा अमेरिकेचा भारत-ब्राझील दोन्ही देशांना विरोध आहे. ब्राझील भारताचा पाचवा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. भारतीय कंपन्यांची 6 अब्ज डॉलर्सची ब्राझीलमध्ये गुंतवणूक आहे. दोन्ही देशांमध्ये 12 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार होतो. भारताचं डिझेल आणि औषधांशिवाय ब्राझीलची इकोनॉमी अपूर्ण आहे. दोन्ही देशांमध्ये कशाप्रकारचे व्यापारी संबंध आहेत, समजून घ्या.

भारताचा व्यापार सरप्लस

ब्राझीलमधील भारतीय दूतावासाच्या आकड्यांनुसार, दोन्ही देशांमध्ये व्यापार खूप मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार 12.20 अब्ज डॉलर म्हणजे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला. भारताने ब्राझीलला 6.77 अब्ज डॉलर म्हणजे 60 हजार कोटी रुपयांचं सामान निर्यात केलं. भारतात ब्राझीलमधून 5.43 बिलियन डॉलर म्हणजे 47 हजार कोटी रुपयाचं सामान आयात झालं. भारताचा ब्राझीलमध्ये 12 हजार कोटी रुपयांचा व्यापार सरप्लसमध्ये आहे.

दोन्ही देशात कुठल्या सामानाची आयात-निर्यात होते?

दोन्ही देशांमध्ये अनेक प्रकारच्या सामानाची आयात-निर्यात होते. भारतातून प्रोसेस्ड पेट्रोलियम प्रोडक्ट्स खासकरुन डीझेल एक्सपोर्ट होतं. शेती वाचवण्यासाठी कीटनाशक भारतातून ब्राझीलला जातात. केमिकल, औषधं, इंजीनियरिंग प्रोडक्ट्स, टेक्सचर्ड फिलामेंट यार्न आणि अनरॉट एल्युमीनियम ब्राझीलला एक्सपोर्ट केलं जातं. भारतातही ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. भारत ब्राझीलमधून कच्चा तेलाची आयात करतो. इथे तो प्रोसेस्ड करुन जगातील अनेक देशात पाठवला जातो. सोया ऑइल, गोल्ड (नॉन-मॉनेटरी), कच्ची साख, कापूस, गोंद, लाकूड आणि तारपीनचा तेल, केमिकल (कार्बोक्सिलिक अम्ल) आणि लोखंड ब्राझीलमधून आयात करतो.

कुठल्या भारतीय कंपन्या तिथे व्यवसाय करतात?

भारताने ब्राझीलमध्ये भरपूर गुंतवणूक केलीय, ज्याची वॅल्यू 6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. दूतावासाच्या आंकड्यांनुसार, ब्राझीलमध्ये भारताची एकूण गुंतवणूक 6 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. भारतात ब्राझीलची जवळपास 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. ग्लेनमार्क, जायडस कॅडिला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड, ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओवीएल), बीपीआरएल, इफको, बजाज, टाटा मोटर्स, महिंद्रा ट्रॅक्टर्स, इंफोसिस, टीसीएस, एचसीएल और विप्रो या भारतीय कंपन्या ब्राझीलमध्ये व्यवसाय करतायत.

भारतात पोलो (ऑटोमोबाइल), वेले (मायनिंग), स्टेफनिनी (आईटी), गेरडाऊ (स्टील), डब्ल्यूईजी (भारी विद्युत मोटर/जनरेटर आदि), कॉम्प्सिस (टोल रोड सॉफ्टवेयर सिस्टम), डेडिनी (इथेनॉल उत्पादन), फार्मास कुंज (बूट), पेर्टो (एटीएम निर्माण), फॅनम (रुग्णालय उपकरण निर्माण) या ब्राझीलच्या कंपन्या आहेत.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.