AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Hindu : बांग्लादेशात हिंदू धोक्यात, ISKCON च मंदिर जाळलं, हिंदुंना घरातून बाहेर काढून बेदम मारहाण

Bangladesh Hindu : बांग्लादेशात परिस्थिती हाताबाहेर गेलीय. तिथे हिंसाचार सुरु आहे. बांग्लादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करण्यात आलय. निवडून-निवडून हिंदुंवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यांच्या घर-दुकानांना आगी लावण्यात येत आहेत.

Bangladesh Hindu : बांग्लादेशात हिंदू धोक्यात, ISKCON च मंदिर जाळलं, हिंदुंना घरातून बाहेर काढून बेदम मारहाण
In bangladesh violence against hindus
| Updated on: Aug 06, 2024 | 1:44 PM
Share

बांग्लादेशात हिंसाचार माजला आहे. जाळपोळ, तोडफोड सुरु आहे. समाजकंटकांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं आहे. बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केलं जातय. जमाव निवडून-निवडून हिंदुंना टार्गेट करतोय. घरांना आगी लावल्या जात आहेत. दुकानं लुटणं सुरु आहे. बांग्लादेशातील मेहरपुर येथील इस्कॉन मंदिराचे फोटो समोर आलेत. समाजकंटकांनी तोडफोड केल्यानंतर मंदिर पेटवून दिलं. बांग्लादेशी माीडिय द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 27 जिल्ह्यांमध्ये हिंदुंच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलय. महागडं सामान लुटण्यात आलं. मंदिरांवर हल्ले करण्यात आले. रिपोर्टनुसार, लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यात धार्मिक हिंदू कार्याशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरी तोडफोड करुन लुटमार करण्यात आली.

दंगेखोरांनी नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांच्या कॉम्प्युटर दुकानात तोडफोड करुन आग लावली. कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपुर गावात 4 हिंदू कुटुंबांच्या घरात तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. हातिबंधा उपजिल्हा पुरबो सरदुबी गांवात 12 हिंदुंची घर पेटवून देण्यात आली. बांग्लादेशी मीडियानुसार पंचगढमध्ये अनेक हिंदु घरांमध्ये तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. ओइक्या परिषदेचे महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांच्यानुसार, असं कुठला जिल्हा नाहीय, की जिथे हिंदुंच्या घरांवर हल्ला झालेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.

हिंदू समाज चिंतेमध्ये

रिपोर्टनुसार हिंदुंना घरातून बाहेर काढून मारहाण करण्याय येत आहे. दुकानं लुटण्यात येत आहेत. या हल्ल्यामुळे बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाज घाबरला असून चिंतेमध्ये आहे. दिनाजपुर आणि दूसऱ्या उपजिल्ह्यात 10 हिंदुंच्या घरांवर हल्ले झाले आहेत. हल्लेखोरांनी रेलबाजारहाट येथे एक मंदिरात तोडफोड केली.

200-300 च्या जमावाकडून हल्ला

बांग्लादेशातील हिंदू-बुद्ध ईसाई परिषदेचे सरचिटणीस उत्तम कुमार रॉय यांनी सांगितलं की, खानसामा उपजिल्ह्यात तीन हिंदुंच्या घरावर हल्ला करण्यात आला. लक्ष्मीपुर येथे गौतम मजूमदार यांनी सांगितलं की, संध्याकाळी 7.30 वाजता 200-300 पेक्षा जास्त हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मजली इमारतीला आग लावली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.