AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agni 5: फक्त चीन-पाकिस्तान नव्हे, अग्नी-5 मिसाईल ‘या’ 5 शक्तिशाली देशांना करु शकते उद्ध्वस्त

भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चर्चा जगभरात सुरु आहे. या मिसाईलची ताकद आणि रेंजमुळे जगभरातील भल्या-भल्या देशांना घाम फुटला आहे. अग्नी-5 मुळे चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांची चिंता वाढली आहे.

Agni 5: फक्त चीन-पाकिस्तान नव्हे, अग्नी-5 मिसाईल 'या' 5 शक्तिशाली देशांना करु शकते उद्ध्वस्त
agni 5 target area
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 22, 2025 | 9:11 PM
Share

भारत संरक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे. भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चर्चा जगभरात सुरु आहे. या मिसाईलची ताकद आणि रेंजमुळे जगभरातील भल्या-भल्या देशांना घाम फुटला आहे. अग्नी-5 मुळे चीन आणि पाकिस्तानसह रशिया, इराक, सौदी अरेबियासारख्या देशांची चिंता वाढली आहे. आगामी काळात युद्ध झाल्यास अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेले हे मिसाईल काही मिनिटांतच वरील देशांवर हल्ला करू शकते. अलिकडेच अग्नी-5 चे प्रक्षेपण ओडिशाच्या चांदीपूर येथे पार प़डले. हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरात प्रक्षेपित करण्यात आले आहे.

अग्नी-5 का खास आहे?

भारताचे अग्नी-5 हे क्षेपणास्त्र सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यात 7.5 ते 8 टन वजनाचे जड वॉरहेड आहे. हे क्षेपणास्त्र दोन प्रकारे वापरले जाऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे एअरबर्स्ट. याचा अर्थ या क्षेपणास्त्राचा हवेत स्फोट होईल आणि त्याचे परिणाम जमिनीवर होतील. यामुळे रनवे, एअरबेस आणि रडार सिस्टम पूर्णपणे नष्ट होईल.

अग्नी-5 वापरण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ते बंकर बस्टर बॉम्बसारखेही काम करते. हे जमिनीच्या आत 80 किमी पर्यंतचे टार्गेट नष्ट करू शकते. याचा वापर शत्रूच्या भूमिगत कमांड सेंटर किंवा अण्वस्त्रे साठवलेल्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. तसेचत अग्नि-5 क्षेपणास्त्र 90 अंशात तीव्र वळण घेऊनही हल्ला करू शकते. या मिसाईलचे वजन 50 टन आहे आणि रेज सुमारे 5 हजार किमी आहे.

अग्नी-5 कोणत्या देशांवर हल्ला करू शकते?

अग्नी-5 हे क्षेपणास्त्र संपूर्ण चीन आणि पाकिस्तानवर हल्ला करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हे क्षेपणास्त्र पूर्वेकडील जपान, उत्तरेकडील दक्षिण रशिया, पश्चिमेकडील इराक आणि सौदी अरेबिया, तसेत दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियाच्या वायव्य समुद्रावर हल्ला करु शकते. तसेच हे दक्षिण आशियासह बऱ्याच देशांना उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. त्यामुळे आगामी काळात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या मदतीने भारत शत्रूंवर हल्ला करु शकतो. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकद कित्येक पट वाढलेली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा