AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित डोवाल यांनी घेतली पुतिन यांची भेट, रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लॅन काय ?

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धादरम्यान भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पीएम मोदींच्या नुकत्याच झालेल्या रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्याला याच्याशी जोडले जात आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली असून पंतप्रधान मोदींची प्रस्तावित शांतता योजना शेअर केली आहे.

अजित डोवाल यांनी घेतली पुतिन यांची भेट, रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लॅन काय ?
| Updated on: Sep 12, 2024 | 8:41 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच आधी रशिया आणि त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली होती. मोदींच्या या दौऱ्यातून स्पष्ट संदेश होता की, भारत कोणा एकाच्या बाजुने नसून तो शांततेच्या बाजुने आहे. दोन्ही देशात शांततेने मार्ग काढण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुतीन यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये झालेल्या बैठकीनंतर यावर सकारात्मक काहीतरी निर्णय़ येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कारण अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोगी यांचा शांतता प्रस्ताव घेऊन मॉस्कोमध्ये पोहोचल्याचे मानले जात आहे.

रशियातील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग येथील कॉन्स्टँटिनोव्स्की पॅलेसमध्ये भारताचे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक केली.

पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याचा प्रस्ताव दिला

दूतावासाच्या म्हणण्यानुसार, चर्चेदरम्यान रशियन राष्ट्राध्यक्षांनी 22 ऑक्टोबर रोजी कझान येथे ब्रिक्स परिषदेच्या बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्यामध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीवर संयुक्तपणे चर्चा केली जाणार आहे. या सोबतच भविष्यातील भागीदारीवरही चर्चा होऊ शकते.

अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. पीएम नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्याची माहितीही त्यांनी शेअर केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही युक्रेन संघर्षाबाबत चीन, ब्राझील आणि भारताच्या सतत संपर्कात असल्याचे सांगितले होते. पुतिन पुढे म्हणाले की, युक्रेनला जर चर्चा सुरू ठेवायची असेल तर मी तसे करू शकतो.

गेल्या एक वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धावरुन जग दोन गटात वाटले गेले आहे. पण भारताने यावर चर्चेने विषय सोडवण्याची भूमिका घेतली आहे. भारत आपल्या भूमिकेवर आधीपासून ठाम आहे. त्यामुळे भविष्यात भारत हे युद्ध रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.